<
जळगाव (प्रतिनधी) – केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ म्हणून १४ कोरोना पेशंट आज तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन आपल्या स्वगृही परतले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी डॉ.स्वप्नील पाटील डॉ.लक्ष्मणसिंह राजपूत यांच्यासह केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव श्री रत्नाकर पाटील, प्रकल्प प्रमुख सतिश मोरे, सागर येवले, सौ. राजश्री डोल्हारे, तेजस पाठक, सचिन महाजन, हर्षल सुर्यवंशी, गोपाळ तगडपल्लेवार, विजय पाठील, उपस्थित होते.
केशवस्मृती प्रतिष्ठानने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ७५ खाटांचे सी सी सी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे.
आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन रूग्णासोबत संवाद साधत आहेत.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, संजय बिर्ला, क्रेडाईचे अध्यक्ष अनिषभाई शहा, नंदू अडवाणी, सहकार्य करीत आहे.