<
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा.डॉ.भास्कर खैरे यांना अंबेजोगाई येथील शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पदस्थापना मिळाल्याबद्दल त्यांना शनिवारी 20 मार्च रोजी निरोप देण्यात आला.
यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.अरुण कसोटे, उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी डॉ.कसोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी बोलताना डॉ.भास्कर खैरे म्हणाले की, सुरूवातीला २०१७ साली मोजक्या मनुष्यबळाला सोबत घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर नियोजन व कार्यपद्धती बसवून महाविद्यालयाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. आज “शावैम” जळगावची झालेली प्रगती पाहून आनंद वाटतो असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
यावेळी डॉ.इम्रान पठाण, डॉ.विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी ए.यु.शिरसाठ, डॉ.इम्रान तेली, डॉ.संदीप पटेल, डॉ.योगिता बावस्कर, अधिष्ठाता कार्यालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.