<
जळगांव(धर्मेश पालवे):-येथील चोपडा तालुक्यातील वैजापूर या गावातील पाच वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार बाबात ,आदिवासी विदयार्थी परिषद जळगांव जिल्हा अध्यक्ष मा करण सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.ज्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग होत घोषणाबाजी केली.हा मोर्चा हा मोर्चा दि१९ऑगस्ट रोजी ठीक11वाजत जी एस ग्राउंड पासून सुरू होऊन जिल्हा अधिकारी कार्यालय पर्यंत येऊन जोरात घोषना देत धडकला.
हजरो च्या संख्येने आलेल्या आदिवासी विद्यार्थीना पाहून उपस्तीताचे लक्ष वेधले गेले. त्याच बरोबर जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन पीडितांना न्याय मिळावा,हे क्रूर कर्म करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या साठी विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांची नियुक्ती करावी,तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, यासह या आरोपीविरुद्ध अल्ट्रासिटी कायद्या नुसार गुन्हा नोंदवावाअसे म्हटले आहे.त्याच बरोबर मनोध्येर्य योजने अंतर्गत या पीडितांच्या पालन व शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.सदर प्रकारच्या गुन्ह्यात शासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा व अश्या आरोपीवर वचक ठेवून आदिवासी अत्याचारग्रस्त मुलींना न्याय द्यावा अन्यथा याही पुढे मोठ्या स्तरावर हा आक्रोश मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी लढा देईल असे आदिवासी विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष करन सोनवणे सह कुवरसिंग बारेला,किसन बारेला,दिलीप बारेला, सूरलाल बारेला यांनी सत्यमेव जयेत च्या प्रीतनिधींना मोर्चाच्या ठिकाणी सांगिलते.