<
जळगाव (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्यमान्य शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महासंघाचे राज्य सहसचिव अशोक मदाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.त्यात बैठकीनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सूचित केल्याप्रमाणे शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी वामन कदम यांना देण्यात आले.
निवेदनातील महत्वाच्या मागण्या
1) नवीन अंशदाई पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागु करावी.
2)शिक्षक भरतीसाठी असलेली टी. ई. टी. ची अट रद्द करून सरळ शिक्षक भरती करण्यात यावी.
3) शिक्षण सेवक धोरण रद्द करून शिक्षकांची स्थायी नियुक्ती करण्यात यावी.
4) शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी.
5) केंद्र सरकार द्वारा देण्यात येणारा निधी प्राथमिक शिक्षणावरच खर्च करण्यात यावा.
6)शिक्षकांना वैद्यकीय भत्ता सुरू करावा.
7) प्राथमिक शिक्षकांना विधान परिषदेवर मतदानाचा अधिकार मिळावा.
8) प्राथमिक शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापकासोबत एक महिला मदतनीस , लिपिक व शिपाई यांची भरती करण्यात यावी.
9) संपूर्ण देशात सेवानिवृत्ती चे वय एकच असावे.
10) शिक्षकांना अध्यापनाच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम देऊ नये.
या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांचे निवेदन मा.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार ,मा.रमेशजी पोखरियाल मानव संसाधन विकास मंत्री ,भारत सरकार , मा.आशिषजी शेलार ( शालेय शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य मुंबई) यांच्या पर्यंत पोहचवण्यात येईल असे अश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी मा.वामन कदम यांचेकडून देण्यात आले.
प्रसंगी महाराष्ट्र राज्यमान्य शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्य सहसचिव अशोक मदाने , महाराष्ट्र राज्य सदस्य टी. के.पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील , जळगाव जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी , भाऊलाल राठोड , श्याम ठाकरे , राकेश पाटील , दीपक टोके , गोविंदा लोखंडे , अजित चौधरी , प्रफुल्ल सरोदे , हेमंत धांडे , महेंद्र चौधरी ,पवार सर , दिलीपसिंग पाटील तसेच सर्व तालुका अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .