<
जळगाव - कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्ण वाढत असून त्याकरीता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्वतंत्रत्र वॉर्ड करण्यात आला असून २३ रुग्णांवर सद्यस्थीतीला उपचार सुरु आहे. मागील दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया येथील तज्ञांनी यशस्वीरित्या केल्या आहेत. मार्च महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दर दिवसाला म्युकोरमायकोसिसच्या दोन ते तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून आतापावेतो २३ रुग्ण उपचारार्थ दाखल आहे. म्युकरमायकोसिसचा फैलाव नाकापासून कान, डोळे, मेंदूपर्यंत झाला आहे का ? याची चाचपणी करण्यात येते. आतापर्यंत ५० वर्षापुढील रुग्ण म्युकरमायकोसिसच्या लक्षणांमुळे उपचारासाठी दाखल झाले असून पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे. नुकताच २८ वर्षाचा युवक देखील म्युकोरमायकोसिस या आजाराच्या विळख्यात आला असून त्याच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. वॉर्ड फुल्ल, डिलक्स रुमचीही व्यवस्था म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात येत असून त्याची सवलत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात देखील मिळत आहे. रुग्णालयातील एक स्वतंत्र वॉर्ड म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी तयार करण्यात आला असून तेथे पेशंटवर उपचार करण्यात येतात, सद्यस्थीतीला वॉर्ड देखील फुल्ल झाला असून व्हीआयपी रुग्णांसाठी डिलक्स रुमची व्यवस्था आहे. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय सज्ज डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नाक, कान, घसा तज्ञांच्या सोबतील फिजीशियन, नेत्ररोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, न्यूरो सर्जन यांची फळीत २४ तास कार्यरत असून एकमेकांच्या सल्ल्याने रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना मिळत आहे. त्याचबरोबर रक्ताच्या चाचण्या, सिटी स्कॅन, एमआरआयसह पॅथॉलॉजी विभाग देखील एकाच छताखाली असल्याने लगेचच रिपोर्ट करणेही सोयीचे होत असून ताबडतोब उपचारालाही सुरुवात होते. यासाठी रुग्णालय सज्ज झाले आहे. म्युकोरमायकोसिस ह्या आजारावरील उपचार हे संपूर्ण : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून होत आहे, रुग्णांनी लक्षणे जाणवताच ताबडतोब रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.