<
जळगांव(प्रतिनिधी)- महीलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात RSETI जळगांव यांच्या सहकार्याने विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी बँकेमार्फत सहा हजार गटांना बँक लिंकेजच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न तसेच २२ गटांचे प्रस्ताव जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. महिलांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यात दर्जेदार उत्पादने तयार करणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या प्रतिनिधीचा सहभाग होता. त्यासोबत तालुकास्तरीय कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या व अभियान कालावधीत जिल्हास्तरीय “मुक्ताई ब्रँड” ची प्रसिद्धी करण्यात आली.
महिलांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी जिल्हाभरातील विविध शासकीय कार्यालयाना बचत गटांचे उत्पादने, सेवा घेण्यासंदर्भात आवाहन करुन आदेशीत करण्यात आले. जिल्ह्यातील युवक युवतीना DDUGKY अंतर्गत जिल्ह्यातील सद्यस्थितीत चालू असलेल्या संस्थेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना/कार्यक्रमाचा/अभियानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY-G अंतर्गत जिल्ह्यात ८ घरकुल आहे. चालू घरकुल मार्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४० महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व आरोग्य संदर्भात पोषण पंढरवाडा संपूर्ण जिल्ह्यात कोविडच्या नियमांचे पालन करुन साकार करण्यात आला. पोषण पंधरवाड्यात विविध उपक्रम पोषण परसबागांची निर्मिती, महिलांचे हिमोग्लोबिन व BMI तपासणीचे विविध कॅम्प घेण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासाच्या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी उद्योग व्यवसाय प्रशिक्षणासाठी तालुका निहाय ऑनलाईन स्वरूपात पॅकेजिंग ब्रॅण्डिंग व मार्केटिंग संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरावरमहिला स्वयंसहाय्यता समूहाची कार्यशाळा घेण्यात आली.
सदरील कार्यशाळेत शासनाच्या विविध योजना बचत गटानपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व पायाभूत माहितीमहिला बचत गटांच्या प्रतिनिधीना देण्यात आली. तालुका स्तरीय कार्यशाळा दिनांक १० मार्च २०२१ व काही तालुक्यांनी ११ मार्च २०२१ घेतल्या व जिल्ह्यातील ९४५ गावांमध्ये महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत विवीध शासकीय योजनांचा कृतीसंगम कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा स्तरीय सर्व कार्यक्रम शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय अंमलबजावणी संनियंत्रण व मुल्यमापन समितीचा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अंमलबजावणी करण्यात येत आहे. महासमृद्धी महिला सक्षमीकरणाच्या व्यापक प्रसिद्धसाठी जिल्ह्यातील सर्व वृत्त पत्रांमध्ये बातम्या काही निवडक वृत्त पत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.
जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायतींना महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात पोस्टर चिटकवण्यात आले.तसेच विविध शासकीय कार्यालयात काॅफी कपाचे वितरण करण्यात आले जेणेकरून शासकीय कार्यालयात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होईल. यासोबतच सर्व १५ पंचायत समित्यांना महासमृद्धी महिला सक्षमीकरणाचे पोस्टर दर्शनी भागात लावण्यात आले. सर्व व्यापक प्रसिद्धसाठी सर्व समावेशक घटकांचा सहभाग घेतला जात आहे.अशी माहिती प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.