<
जळगाव – महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी सुरू केलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती समिती दलाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सभा दालनात 22 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
या बैठकीत बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेंबाबत विविध विभागांचा आढावा घेणे, सन 2019-20 या कालावधीतील वार्षिक जिल्हा कृती आराखड्याबाबत चर्चा करणे, प्रचार प्रसिध्दी बाबत चर्चा करणे, सन 2018-19 मध्ये विविध विभागांना वितरीत करण्यात आलेल्या निधी खर्चाबाबत चर्चा, pcpndt कायद्याची प्रभावी अंमलबजावणी बाबतची चर्चा करणे, महत्वाच्या विभागांचे नोडल अधिकारी नियुक्तीबाबत चर्चा, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत चर्चा करणे, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत चर्चा करणे आदि विषयांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.