Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ठाणे जिल्ह्यात १४ जून ते २१ जून पर्यंत लॉकडाऊनचे नवीन निर्बंध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2021
in राज्य
Reading Time: 2 mins read

ठाणे दि. ११ (जिमाका) ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते २१ जून २०२१ पर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.

विविध भागांमध्ये कोविड १९ बाधितांची कमी-अधिक प्रमाणातील रुग्ण संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात निर्बंध लागू करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येकी १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलो महानगरपालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक (Separate Administrative Unit) म्हणून निर्माण करणेत आले आहेत.

तर उर्वरित मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव. बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक (Single Separate Administrative Unit) निर्माण करणेत आला आहे.

ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र स्वतंत्र प्रशासकीय घटक वगळून उर्वरित) एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for Breaking the Chain अंतर्गत स्तर ३ (Level 3) या स्तराचे निबंध खालीलप्रमाणे लागू करत आहे.

१) सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.

२) अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.

३) मॉल्स / सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन / नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४) रेस्टॉरेंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं. ४.०० वा. नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/ पार्सल सर्व्हीस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

५) उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.

६)सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत सुरू राहतील

७) खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये
वगळून )सुरू राहतील.

८)कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह (खाजगी जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.

९) क्रिडा सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०) चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं. ५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही.

११) सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत
सुरू राहतील.

१२) लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३)अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४)बैठका स्थानिक संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका हॉलच्या सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५)बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं. ४.०० वा. पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६) कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील.

१७) ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८) जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील.

१९) व्यायामशाळा/ केश कर्तनालय / ब्यूटी सेंटर्स / स्पा / वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील, परंतु गिर्‍हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०) सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतु, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१) मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तीसह वाहन चालक हेल्पर स्वच्छक किंवा इतर असे ३) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२) खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५० मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील)
नियमितपणे परवानगी राहील.

२३) उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

२४) उत्पादनाच्या अनुषंगाने
१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह

२) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते.ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते
पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४) अत्यावश्यक गंभीर स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /
आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

२५) उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदरचे आदेश दि.१४ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दि.२१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत लागू राहतील.

वरील आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होऊ नये यासाठी द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन

Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होऊ नये यासाठी द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन

संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होऊ नये यासाठी द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications