<
राष्ट्रीयकृत बँकेची अलोट गर्दी पाहता पुन्हा एका शाखेची मागणी
जळगांव-(धर्मेश पालवे)-येथील नशिराबाद हे गांव मोठ्या लोकसंख्या वस्तीचे व जुन्या बाजापेठेचे असे वेगळी ओळख असणारे गाव आहे.येथे कामगार वर्ग व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात,आणि म्हणून आर्थिक व्यवहारही सुरू असतात,मोठी ग्रामपंचायत असल्याने नेहमीच आर्थिक व्यवहार हा लोकांना करण्यास येथे एकच युनियन बँक ही राष्ट्रीय कृत बँक आहे,संजय निराधार योजना, अपंग आधार योजना, व खाजगी खाते तेही या बँकेत आहेत .गेल्या महिन्यापासून पावसाच्या रिपरिप व उघडझाप मुळे आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या ,या दिवसात लोकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहून नंबर लावावा लागतो, तर अंध अपंगांना बसण्या उठण्या ची सोया नसल्याने तातखळत वेळ काढवा लागतो. त्याच बरोबर पिण्याचे पाणी,व वृद्धांना बसण्याची सोय नसल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे.गेल्या वर्षीही या ठिकाणी दुसरी राष्ट्रीय कृत बँकेची शाखा बनवावी अशी मागणी होती.आज रोजी या बॅँकेत खुप गर्दी आल्याने व कामासाठीचा तान कर्मचारी वर्गाकडून कमी होत नसल्याचे होणारे गावकऱयांचे हाल पाहता येथील बँक ग्राहक व ग्रामपंचायत सदस्य मा प्रदीप भाऊ साळी यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून नवीन शाखेची मागणी होत असल्याच,व ही मागणी पूर्ण व्हावी असे शासनाने आपल्या परीने प्रयत्न करावे असेही सांगितले.