<
जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील कुसुंबा येथील श्रीस्वामी समर्थ इंग्लिश मेडियम मध्ये ऑनलाईन योग शिबीर घेण्यात आले.
यात योगविद्येची माहिती देत योगसाधनेचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले. या या ऑनलाईन शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योगसाधना केली. यावेळी शाळेच्या वतीने काही प्रात्यक्षिके विद्यार्थी व पालकांकडून करून घेतली. व्यायाम व योगाचे महत्व सांगणारी काही गीते देखील सादर करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज पाटील होते. सदर ऑनलाईन योग शिबिरास शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती यांनी मार्गदर्शन करुन योगशिक्षिका कामिनी पाटील यांनी योगा करुन दाखविला. सदर ऑनलाईन योगशिबिराचे सूत्रसंचालन कला शिक्षक अविनाश घुगे यांनी केले तर आभार नयना वानखेडे यांनी आभार मानले.