<
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार कार्यक्रम; आश्रय माझे घर व मातोश्री आनंदाश्रमचा उपक्रम
जळगाव : प्रौढ मतिमंद, गतिमंद आणि विकलांग मुलांचे आजीवन संगोपन करण्याव्यतिरिक्त त्यांना आत्मनिर्भर करणारी ‘आश्रय-माझे घर’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेला देणगी स्वरुपात मिळालेल्या सोलर पॅनल, व मातोश्री आनंदाश्रमात जिल्हा नियोजन व विकास निधीतून प्राप्त झालेल्या ओपन जिम साहित्य आणि ट्रान्सफॉर्मर यांचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. २७ जून रोजी सकाळी ११ वा. शांतीवन परिसर, गिरणा पंपिंग रोड, मातोश्री आनंदाश्रम शेजारी, सावखेडा शिवार येथे होणार आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सुशिल असोपा यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन डॉ. प्रताप जाधव, सौ अनिता कांकरिया व आश्रय माझे घर’ आणि मातोश्री आनंदाश्रमच्या सर्व संचालक मंडळाने केले आहे.