<
पांढरी बुरशी आणि काळी बुरशीजन्य आजार डोके वर काढत असतानाचे आपण पाहतोय. आता पावसाळा आला आहे, मागच्या पेक्ष्या आताचा या वर्षी चा 1 ला पाऊस नवनवीन आजारांच आगमन करणारा आहे हे आपण म्हणू शकतो. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कानात बुरशीचे प्रमाण वाढले आहे याची लक्षणे, कारणे, आणि उपचार जाणून घेणं आवश्यक आहे.
लक्षण–
कान दुःखने, बंद होणे, ऐकायला कमी येणे, कानातून पाणी येणे किंवा कानात सूज येणे अशी लक्षण असणे.
उपचार–
कानाचा तपास करून, कानातील बुरशी साफ करण्यात येते व कानाचे थेंब ड्रॉप्स दिले जातात.
कानात बुरशी होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
कानाला बुरशी संसर्ग होऊ नये म्हणून अंघोळ करतांना कानात पाणी जाऊ देऊ नये.
नेहमी वापरल्या जाणाऱ्या कान साफ करण्यासाठीच्या एअर बड्स चा वापर टाळावा.
कानात तेल अथवा बाजारात मिळणारे कुठलेही ड्रॉप्स आपल्या डॉक्टराना विचारल्या विना टाकू नका.
कान कोरडे ठेवा.
रक्तातील साखरेचा आजार असल्यास नियंत्रणात ठेवा
कानाची बुरशी झाल्यास उपचार आवश्यक आहे. तेव्हा वेळीच काळजी घ्या.
डॉ श्वेतल चोपडे
(नाक कान घसा तज्ञ)