<
ठाणे- (प्रतिनिधी) – कसारा ता. शहापूर येथील आदर्श शिक्षिका सौ. मनिषा विकास हिवरे या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
कसारा प्राथमिक शाळेत त्यांनी आज पर्यंत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लोकसहभागातून १२ लाखाचे फिल्टर वाॅटरप्युरिफाय प्लॅन्ट उभारण्यात आले आहे. युवा फाउंडेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता शौचालय बांधकाम देखील केले आहे.
तसेच लोकसहभागातून शाळेतील वर्ग खोल्या डिजिटल केले आहे. व शाळेच्या आवारात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे अनेक विद्यार्थी हिताची कामे अनेक वर्षांपासून करित आहेत.
प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका असतांना एवढे जबाबदारीचे पद सांभाळून रविवारच्या रिकाम्या वेळाचा उपयोग करुन, काही खाजगी कंपनीच्या बिझनेस मधुन आर्थिक उत्पन्न मिळवत असतात.
याच कामातून त्यांना पहिल्यांदा मिळालेला ५ हजार ६४ रुपयांचा चेक त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत व समाजकार्याच्या भावनेतून त्यांचे पती सेवानिवृत्त विकास हिवरे यांच्या सह उपस्थित राहुन राईट्स ऑफ़ वुमेन संचलित आई सावली बालभवन अनाथाश्रमास भेट म्हणून दिला आहे.
संस्थेच्या वतीने आभार देखील व्यक्त करण्यात आले,यावेळी संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.