<
जळगाव- पदवीस्तरावरील अभ्यासक्रम तयार करतांना कायदे विषयक साक्षरता, पर्यांवरणाबद्दलची संवेदनशीलता आणि भारतीय संदर्भांचा अभ्यासात अंर्तभाव यांचा विचार होणे अत्यंत आवश्य्क आहे अन्यथा शिक्षण व्यवस्था ढासळेल असे मत इंदौर येथील प्रा. रंजना सहगल यांनी व्यक्त केले.
फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर, युजीसी-मानव संसाधन विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्त्र महराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत येणारे इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र , संरक्षणशास्त्र विषयांच्या अभ्यासमंडळांचे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अध्यक्ष आणि प्रत्येकी एक सदस्य यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला शुक्रवारी प्रारंभ झाला. या कार्यशाळेत बीजभाषण करतांना प्रा. सहगल बोलत होत्या.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन झाले. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, भारतीय शिक्षण् मंडळाचे अखील भारतीय सहप्रमुख प्रा.अमितकुमार दशोरा, प्रा. रंजना सहगल, केंद्रीय विद्यापीठ, हरियाणा येथील डॉ. धिरेश कुलश्रेष्ठा, अधिष्ठाता प्राचार्य लता मोरे, प्राचार्य प्रमोद पवार उपस्थित होते.
बीजभाषणात प्रा.सहगल म्हणाल्या की, शिक्षण पद्धतीत सर्वांना बदल आपेक्षीत आहे. परंतु अनेक बाबी सरकारवर ढकलून आपण मोकळे होतो. आपणही या व्यवस्थेचा भाग आहोत हे विसरुन जातो. पालक-विद्यार्थी-संस्था-शिक्षक या सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. परीक्षेच्या मूलयमापन पद्धतीत त्रृटी असून भाषा, सामाजिकशास्त्र या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणे अशक्य् असतांनाही ते दिले जातात. मात्र या विद्यार्थ्यांना साधा अर्जही लिहता येत नाही. शिक्षणातून संस्कृती हा मुद्या हद्दपार झाला आहे. विद्यापीठांमधून अनेक नवे प्र्रकल्प आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत ज्या मधून विद्यापीठाला महसूल प्राप्त् होईल. कायद्याची ओळख, पर्यावरण या बाबी अभ्यासक्रम तयार करतांना जाणिवपूर्वक आणल्या जाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त् करतांना प्रा.सहगल यांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करण्याऐवजी भारतीय सांस्कृतीचा अंतर्भाव अभ्यासक्रमात व्हावा, असे बोलून दाखविले.
कुलगुरु प्रा.पाटील यांनी सामाजिकशास्त्रांमध्ये होणारे संशोधन सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारे असून समाजातील असंख्य प्रश्न सुटायला याद्वारे मदत होते. भौतिक प्रगती होत असली तरी सामाजिक प्रश्न् गुंतागुंतीचे होत आहेत त्याचे उत्तर सामाजिकशास्त्रच देऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधतांना अभ्यासक्रम तयार करतांना शहरी विद्यार्थ्यांसोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी.एस.निकुंभ यांनी सुत्रसंचालन केले. दिवसभराच्या या कार्यशाळेत डॉ. अमितकुमार दशोरा यांनी नवीन भारतासाठी अभ्यासक्रम, डॉ. कविता सांळुखे (नाशिक) यांनी शैक्षणिक विश्लेषन आणि डॉ. धिरेश कुलश्रेष्ठा यांनी अभ्यासक्रमाची रचना या विषयावर मार्गदर्शन केले.