Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपेक्षित कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील- ना. गिरीष महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- गेल्या कित्येक वर्षांपासून उपेक्षित असलेला बांधकाम क्षेत्रातील कामगार दुर्लक्षितच होता. केंद्र व राज्य शासनाने या कामगारांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात लाभाच्या योजना राबविल्याने आज खऱ्या अर्थाने गाव, तांड्यावरील कामगारांचे जीवनमान उंचावण्यास शासन मदत करीत असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले.

            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांसाठी 29 कल्याणकारी योजनांचा लाभ वाटपाचा सोहळा पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते जामनेर, जि. जळगाव येथील स्व. इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा उज्वलाताई पाटील, पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील, कामगार आयुक्त जि.जे. दाभाडे, चंद्रकांत बाविस्कर, गटविकास अधिकारी अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे आदि उपस्थित होते.

            उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ना. महाजन पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांच्या व कष्टकरी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.  बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारास मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. याकरीता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अशा कामगारांची नोंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ सर्व नोंदीत झालेल्या बांधकाम कामगारांना मिळाला पाहिजे. याकरीता एकही कामगार नोंदणी वाचून राहणार नाही याची मंडळाने दक्षता घेण्याचे आवाहनही ना. महाजन यांनी केले.

            कामगार कल्याण मंडळाचे सचिव श्रीरंगम निवास यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, राज्यात आतापर्यंत 18 लाख 75 हजार कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. 5 लाख 98 हजार कामगारांना लाभाच्या किटचे वाटप करण्यात आले. मंडळामार्फत कामगारांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. शासनाच्या वतीने राज्यात पुणे, मुंबई, नागपूर व ठाणे या चार जिल्ह्यात कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते मीना कुमावत, संगीता पाटोळे, अलका महाजन, भगवान मिस्त्री, संजय मिस्त्री, रमेश महाजन, रामदास पाटील, राजू लोहार, अशोक पाटील आदींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश व लाभाच्या किटचे वाटप करण्यात आले. जामनेर तालुक्यात 1750 कामगारांची नोंदणी करण्यात आली. आज 1500 कामगारांना लाभांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

            कार्यक्रमास आतिष झाल्टे, महेंद्र बाविस्कर, श्रीराम महाजन, अशोक पालवे, जीतू पाटील, पितांबर भावसार यांचेसह नासिक व जळगाव येथील कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार व त्यांचे कुटूंबिय,  नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग.स.सोसायटी लोकसहकार गटाचा मनमानी कारभार- किशोर पाटील कुंझरकर

Next Post

अजीम खान यांना राजस्थानी शिक्षक रत्न पुरस्कार

Next Post
अजीम खान यांना राजस्थानी शिक्षक रत्न पुरस्कार

अजीम खान यांना राजस्थानी शिक्षक रत्न पुरस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo