<
जळगाव(जिमाका)- जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात 21 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 4 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक, कायदेशीर प्रकरणे जसे-वारस इ. तसेच नीती आधारित सूचना/तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. बी. एच. नागरगोजे, अधिक्षक डाकघर, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.