<
नाशिक प्रतिनिधी : मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्यातील नार, दमणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. आदिवासी पट्यात 18 तासांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला. गोदाकाठच्या काझीगढीवरील 35 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर शहरामध्ये पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती तयार झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टी पाऊस झाल्याची नोंद.
गंगापूर धरणातून पाणी न सोडताही गटारीचे पाणी शिरल्याने गोदावरीच्या पातळीत दुतोंडी मारुतीच्या मांड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . दुपारी काहीवेळ पावसाने सततधार होत असल्याने ही पातळी दुतोंडी मारुतीच्या घोट्यापर्यंत पोचली होती. पण दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने पातळी वाढण्यास सुरवात झाली आहे. रामकुंड भागातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. शिवाय गोदाकाठच्या शेतकऱ्यांमध्ये पुराच्या शक्यतेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे नाशिक-पुणे आणि मुंबई-आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हाभरातील पाऊस (आकडे मिलीमीटरमध्ये) तालुक्याचे नाव आज सकाळी 8 पर्यंत 24 तासातील पाऊस नाशिक 29.5इगतपुरी 170 त्र्यंबकेश्वर 135 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 160)दिंडोरी 34पेठ 105 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 101)निफाड 21.3सिन्नर 17चांदवड 10देवळा 15.4येवला 8नांदगाव 1मालेगाव 3बागलाण 4कळवण 21सुरगाणा 104.2