<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सुनील बावस्कर ,केसीई चे शालेय समन्वयक के.जी.फेगडे ,मुख्या.रेखा विकास पाटील ,मुख्या.डी. व्ही.चौधरी, मंजुषा चौधरी आदींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम इयत्ता 3री च्या विद्यार्थ्यांना बॅट ,बॉल , हॉकी ,लगोरी , डंबेल्स ,घुंगरूकाठी, थाळी , फुटबॉल आदी खेळाच्यासाहित्याची ओळख उपशिक्षक योगेश भालेराव यांनी करून दिली तर इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांना फिट इंडिया मोव्हमेंट हा मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रबोधनपर कार्यक्रम प्रोजेक्टर च्या साहाय्याने दाखवण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव , इंदू चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी सूर्यकांत पाटील चित्रलेखा गुरव , वायकोळे , नेमीचंद झोपे ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.