<
जळगाव(प्रतिनिधी)- गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहे. परिणामी शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचेसोबत हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश माळी, गटनेते कैलास चौधरी, नगरसेवक दिपक झांबड, गोपाळ भाऊ गंगतिरे,रवींद्र भाऊ खेवलकर,प्रदिप बडगुजर,भरत पाटील,मुकेश कऱ्हाळे, भगतसिंग पाटील, शंकर चिखलकर, हमीद पठाण, महेश शेळके उपस्थित होते.