<
यवतमाळ – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सामाजिक ग्रामीण परिवर्तन व राष्ट्रीय सेवा योजना चमु गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद तालुक्यातील मुख्यमंत्री दत्तक ग्राम शेलु (खु) या गावांमध्ये बेटी बचाव बेटी पढाओ या ज्वलत विषयावर जागर आणि पथनाट्य घेतले या पथनाट्य मधून लोकांना महिला ह्या पुरुषबरोबर कोणत्याही क्षेत्रात खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत आणि येणारा काळात मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत त्यामुळे मुली वाचवा स्त्री भृण थांबवा असा संदेश या जागर आणि पथनाट्य मंधून गावकर्यांना दिला या कार्यक्रमाला गावकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी गावचे सरपंच पंडित घाडगे. ग्रामपरिवर्तक शिल्पा बहाडे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुधीर गोटे,प्रा.पखाले सर व गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय,पुसद चे राजु गायकवाड, शिलानंद श्रावणे, दीपक चव्हाण,अविनाश राठोड, विरेंन डोंगरे,निकिता ऐडतकर,कीर्ती पौळ,कांचन डाकरे,पायल मस्के, कोमल पिंपळे,गोपाल राठोड, निकिता भुरे,प्रशांत गुव्हाडे, ममता कांबळे हे विध्यार्थी उपस्तीत होते.