<
जामनेर(शांताराम झाल्टे)- एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना जळगाव जिल्ह्याचे समन्वयक सिताराम सोनवणे यांनी तालुक्यातील गारखेडा बु. येथे तालुकास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गारखेडा बु. सरपंच मंजुळाबाई शालिक पवार असून याप्रसंगी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. आदिवासी मेळाव्याचे उद्घाटन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. यावेळी देविदास पवार व महाराष्ट्र राज्याचे युवानेत्यांनी आदिवासी समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
एकलव्य आदिवासी क्रांती दलातर्फे बेरोजगार आदिवासी बांधवांना रोजगार संधी मिळावी म्हणून तालुक्यातील आदिवासी बांधवांना एकलव्य आदिवासी क्रांती दल तर्फे मोफत जाळे वाटप करण्याचे घोषित केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब बोरसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सर्व आदिवासी बांधवांना संघर्ष करून न्याय मिळवण्यासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या झेंड्याखाली सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. कुठलाही आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना सदैव प्रयत्न करेल असे समाज बांधवांना सांगितले.
या ठिकाणी बाबासाहेब बोरसे, देविदास पवार, युवाध्यक्ष विलास पवार, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख सिताराम सोनवणे, राकेश पेंढारकर, सोशल मिडिया प्रमुख, तालुका युवाध्यक्ष विनोद पवार, तालुका सचिव सुभाष दादा, तालुका खजिनदार ज्ञानेश्वर सोनवणे, तालुका युवा उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, भुसावळ तालुकाध्यक्ष राजेश गायकवाड, माजी सरपंच मिठाराम मोरे, सरपंच गारखेडा खु. माधवराव महाजन, माजी सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच जगदीश महाजन, शालिक पवार, मुकुंदा नरवाडे, राजेश जोशी, दीपक ठाकरे,अशोक मोरे, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख सिताराम सोनवणे यांनी नवनियुक्त पदाधिकारी व सर्व आदिवासी बांधवांना सहकार्याचे आवाहन केले व आभार व्यक्त केले.