<
“हॅलो रवी….!”
“हा बोल ना तरू…
“रवी, मला माफ करशील प्लीज”
“का… काय झालं ?”
तरू च्या मॅसेज मुळे रवीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.कारणही तसेच होते.
तसे तर एकाच गावात रमलेले हे दोघं !रवी सिन्ना आणि धानुष्का देसाई(तरू) लहानपणापासूनचे छान मित्र होते. अभ्यासातही दोघांची ओढाओढ चालायची.
विचार, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या कोणत्याच गोष्टीची कसर होळकर गुरुजींनी सोडली नव्हती. गावात आजही असं म्हणतात की, होळकर गुरुजींच्या हातात शिकलेले विद्यार्थी यशोशिखरावर पोहचल्या शिवाय राहत नाही.
होळकर गुरुजींची शिकवण्याची पद्धत अतिशय अनुकूल होती पण ते खूप मारायचे. त्याच्या छडीची जादू आता कुठं गळ्यास पडू लागली होती.अशा प्रकारे मातीच्या मुर्त्या घडवण्याचे पवित्र कार्य होळकर गुरुजी करत असे.
हे सर्व घडत असताना रवी तरूच्या प्रेमात गुंतत गेला.तशी होतीच ती….
घायाळ करणार रूप तिचं,हिवाळ्यात तृणपातावर पाण्याचा थेंब थांबावा तशी डोक्यावरची रोज नवनवीन रंगाची बिंदी तिची.
मे महिन्याच्या उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीला पाणी आणि सावलीचा गारवा मिळावा तसा तिचा स्वभाव होता.दोन्ही बाजूने साखळ्यांच्या कड्यासारख्या केसांच्या वेनीची उतरती वेल तिची !
खुप गोड बोलायची ती….
हसू कधी आवरेनाच तिचा…
गुलाबांच्या पाखळ्याना लाजवेल तसे ओठ होते तिचे… एकंदरीत प्रियसी कशी असावी याच उत्तम उदाहरण होती ती
किशोर वयात स्वतःला आवरणे रवीला कुठं जमले !तो आता पूर्णपणे तिच्या प्रेमात डुबला होता.
नंतर नको ते घडले…., प्रेमबिम ही पाश्चीम्यातली संस्कृती ! आपल्याकडे प्रेमाबद्दल वैरभाव जास्त.या देशात विशेष म्हणजे तांडा वस्ती कडे प्रेमा विषयी इतकं जहर कोण पेरत देव जाणे !
खरं तर ती गेली खूप दूर रवी च्या आयुष्यातून .याच समाजव्यवस्था आणि संकुचित विचारामुळे.कारण प्रेम हतबल झाला होता या सामाजिक बंधनामुळे..
आणि मग शिल्लक राहिला तो म्हणजे फक्त गैरसमज !कुणाचीही चूक नसताना दूर व्हावे लागले होते .तेवढ्यात तिचा रिप्लाय येतो .”माझ्यामुळे तू दुखावला गेला असशील””आपल्यात अनेक गैरसमज झाले”
“इट्स ओके तरू…
त्यात तुझी काही चूक नाही”
किती नितळ रे हे प्रेम !
दोघे किती पटकन मोकळे झाले होते सर्व काही बोलून..अहंकार , मीपणा , कर्तुत्वाची भावना जो पर्यंत डोक्यावर चढलेली होती तो पर्यंत नात्याला कीड लागली होती. काही लोक त्याला खतपाणी घालत होते.हा इगो समजूनही उमगत नाही. नात्याला डागा घातला की तो कधीच धुतला जात नाही.
इगो मुळे पार पिचून जातो आपण. बाजूला सार हा कोरडा इगो आणि एकदाच कधीही दूर न होण्यासाठी जवळ ये… कायमची…
विरहाची आग फार चटके देते ग.., शरीराला आणि मनालाही…
तू दूर करत असलेले गैरसमज त्रासदायक आहेत कसं म्हणू…. ते तर हृदयाला झालेल्या जखमा आहेत.. जे माझ्या मनाला पुरती घायाळ करते.किती स्वतंत्र विचार होते आणि आहे आपले उगाच आपण दुसऱ्याच्या विचाराने विचार करीत होतो.
हा वास्तववादी आणि नितीमुल्याने प्रेम करणारा रवी एक दिवस तुझ्या मनाला सलत राहील याचा विश्वास होता मला.तू थोडंसं हिम्मत करून माझ्या वाळवंटी मनाला पुन्हा कोकण बनवलय.
आता मी जीव देईल पण तुला जाऊ देणार नाही.आणि ही मैत्री आपण कायम ठेवूया. आणि एक दिवस या समाज व्यवस्थेला सडेतोड उत्तर देऊया.तो पर्यंत फक्त संघर्ष एके संघर्ष.येणारा दिवस आपल्यासाठी मिलन घेऊन येवो हीच श्री.राधाकृष्ण चरणी प्रार्थना राहील.
तेवढ्यात रवीची आई म्हणाली- “रवी, उठ बाळा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असतो. आज ऑफिस ला जायचयं न व्ह तूला ?”आणि रवी स्वप्नातून जागा झाला.
टिप- कथा काल्पनिक आहे.सत्य जीवनाशी काहीही संबंध नाही.
लेखन- सूरज सुभाष जाधव
अध्यक्ष- महाराष्ट्र वक्तृत्व परिषद
विद्रोही कवी, आशावादी लेखक, युवक स्पीकर पुरस्कार, 2020