<
”दाल में कुछ काला है,या पुरी दाल हि काली है”
जळगाव -(दिपक सपकाळे)- येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयाकडून माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास गेल्या अनेक दिवसांपासून टाळाटाळ होत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
सविस्तर असे की ,सदर महिला महाविद्यालयाकडे दिनांक ०३/०८/२०१९ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ते दिपक सपकाळे यांनी २ अर्ज करण्यासाठी त्यांचा सहकाऱ्यांना पाठविले होते त्यावेळेस त्यांनी अर्ज घेण्यास टाळाटाळ केली होती व अर्ज स्वीकारलेच नव्हते. याबाबतचे वृत्त सत्यमेव जयते ने प्रसिद्ध केले होते. तसेच अर्ज न स्वीकारल्याने संबंधित अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात आले होते. त्यानंतर तेथील प्राचार्य डॉ. जयश्री एम.नेमाडे यांनी पत्र पाठवले होते व त्यात म्हटले होते की आपण कार्यालयात येऊन माहितीचे वर्णन करावे व अपेक्षित माहिती शुल्क भरल्यानांतर देण्यात येईल. या पत्राचा संदर्भ घेऊन अर्जदार हे सादर महाविद्यालयात गेले असता प्राचार्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली व आपण पुन्हा एक पत्र पाठवून कालावधी नमूद करून द्यावा. अर्जदार यांनी दिनांक २०/०८/२०१९ रोजी पत्र दिले होते.
त्यावर या महिला महाविद्यालयाचे जनमाहिती अधिकारी डॉ.हिरालाल व्ही. चव्हाण २८/८/२०१९ यांनी ६ ओळिंचे पत्र पाठवले आहे. व त्यात म्हटले आहे की , मागितलेली माहिती , माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ कलम -८ -ड नुसार देता येत नाही, व हि माहिती आपल्या अधिकार कक्षेतील नसून आपला या कार्यालयाशी संबंध नाही. असा उल्लेख केलेले पत्र पाठवलेले आहे.
पण या महिला महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने महिला विद्यापीठाची दिशाभूल करून महिला वसतिगृह अनुदान लाटले आहे.इमारत उभी करून त्याठिकाणी खाजगी शाळा चालवत आहे. त्यातून संचालक मंडळास उत्पन्न देखील मिळत आहे. मग याबाबत एखाद्या अर्जदाराने माहिती मागवली तर ती जनहिताची का असू शकत नाही ? सदर माहिती जनहिताचीच आहे त्यामुळे हि माहिती महाविद्यालयाने देणे बंधनकारक आहे.
दुसऱ्या अर्जात अर्जदाराने सदर महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी भरती विषयक माहिती मागितली आहे यासाठी देखील संबंधितांनी कलम -८ -ड चा वापर करून माहिती नाकारली आहे. भरती प्रक्रियेविषयी मागितलेली माहिती हि जनहिताशी संबंधित आहे, व हि माहिती अर्जदारांना उपलब्ध करून देणे सदर कायद्यान्वये बंधनकारक आहे.
अशा जनहिताच्या माहिती देण्यासाठी सदर महिला महाविद्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दाल में जरूर कुछ काला है या दाल हि पुरी काली है हि म्हण या ठिकाणी लागू होते.
माहिती नाकारतांना फक्त कलमांचा उल्लेख करून माहिती नाकारणे सदर कायद्यास अपेक्षित नाही. त्यास सबळ कारण असणे देखील बंधन कारक आहे. सद्या अनेक शैक्षणिक संस्था मोठ मोठे शासनाचे अनुदान लाटण्यासाठी शासनाची दिशाभूल करतात व माहिती अधिकारात माहिती मागितली की, असे निरर्थक व आधार नसलेले उत्तरे माहिती अधिकारात देऊन वेळ काढून नेत असतात, व माहिती देण्यास टाळाटाळ करतात. जळगाव जिल्यात अशा अनेक संस्था आहेत असे देखील अर्जदार यांनी सांगितले. अशा भ्रष्टचारी शैक्षणिक संस्थाचे पितळ उघडे पाडण्याचे काम सत्यमेव जयते करणार आहे.