<
भडगाव(अबरार मिर्झा)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित शासकीय तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा सौ.सु.गि.पा.विद्यालय,भडगावच्या मैदानावर राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडल्या,या स्पर्धेत क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव, संचलीत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुले व मुलींच्या दोन्ही संघानी आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपापल्या गटातील खो-खो सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयश्री खेचुन आणली. खो-खो तील अंतिम सामन्यात मुलांनी सौ.सु.गि.पाटील,विद्यालय भडगाव संघाचा डावाने तर मुलींनी आदर्श कन्या विद्यालयाचा पराभव करुन विजय संपादन केला.खो-खोत मुलांमध्ये अक्षय मोरे,चुडामण मोरे,योगेश भामरे,हर्षल पाटील,जगदीश बिराडी,महेश हिरे तर मुलींमध्ये सत्यभामा पवार,मुस्कान शेख,फरहाना कौसर,प्राजक्ता जोशी,श्रध्दा साळुंखे,अंकीता अहिरे,दिव्या पाटील आदिंनी उत्कृष्ट खेळ केला. विजयी मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून बी.डी.साळुंखे तर मुलींच्या संघास माया मराठे या लाभल्या तर विजयी दोन्ही संघास राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी चारही संघांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामदादा भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार ,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.