<
अमळनेर(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद जळगाव आयोजित सेवा व समर्पण अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात लसीकरणाचा महाकुंभ पार पडला. त्यात भाजपाचे आमदार गिरीष महाजण आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नातून २७ रोजी एकाच दिवशी अमळनेर तालुक्यात सुमारे १० हजार १०० जणांना लसीकरण करण्यात आले. पैकी चौबारी येथे ५०० जणांना लसीकरणाचा लाभ मिळाला.
लसीकरणादरम्यान स्मिताताई वाघ यांनी धावती भेट देत लसीकरणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, शहर युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, तालुका युवा मोर्चा चिटणीस निखिल पाटील आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात मल्हारी दंगल पाटील, रवींद्र मोरे आणि संजय पाटील यांनी चौबारी गावात लसीकरण व्हावे म्हणून स्मिताताई वाघ यांच्याकडे तगादा लावला होता, त्या विनंतीला मान देत स्मिताताई वाघ यांनी चौबारी गावासाठी ५०० कोविशिल्ड डोस उपलब्ध करुन दिले.
लसीकरणासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, आरोग्य सहाय्यक अशोक अधिकार, आरोग्य सेविका पी. एन. ईशी, आरोग्य सेवक किरण चौधरी, गट प्रवर्तक आशा पाटील, आशा सेविका मिना पाटील, भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका निर्मलाबाई पाटील, मिना पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे, जगतराव पाटील, योगेश अहिरे, तुषार पाटील, समाधान पाटील, विकी पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, हेमंत पाटील, बाळा पाटील आदींचे सहकार्य लाभले.