<
आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या विविध अवस्था आहेतच .बालपण ते म्हातारपण यामध्ये विविध जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो. यामध्ये आपल्या आयुष्याच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष भेटून अनेकजण मार्गदर्शन करतात. तसेच या सोबत आपल्यात भेटीचे जिद्द निर्माण करून एक कुशल मार्गदर्शक स्वरूपी औषध म्हणजे दैनिक वृत्तपत्र होय. आपल्याला वाचनाची आवड असेल तर सकाळी उठल्यावर आपले दिन कार्य सुरू करण्याच्या आधीच आपल्याला ज्या गोष्टीची जाणीव भासते व ती वाचणे आवश्यक वाटते ती गोष्ट म्हणजेच दैनिक वृत्तपत्र होय. आपण जर वृत्तपत्रांकडे आपला एक सखा सोबती या सकारात्मक विचारातून आपल्या दृष्टिकोनातून निर्माण होणारा सकारात्मकतेचा विचार केल्यावर आपल्याला येणाऱ्या अनेक स्वरूपाच्या विविध सामाजिक भौगोलिक अभ्यासातील संदर्भ अडचणींना आपण सहजगत्या सामोरे जाऊ शकतो.
आपल्या शैक्षणिक जीवनात एखाद्या वर्षाचा निकाल अपयशी ठरला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या क्षणाला न डगमगता आपण आता कोणती भूमिका निभवायला पाहिजे हे विद्यार्थ्यांना माहिती मिळवायची असेल तर निकालानंतरच्या प्रसार माध्यमातील एक घटक वृत्तपत्र त्यांच्या मार्गदर्शक तत्वातील माध्यमातून विविध विषयांमध्ये तज्ञ असणार्या व्यक्तींची मुलाखत किंवा त्या विषयावर त्यांनी केलेल्या लिखाणाची समर्पक वाटणारी प्रबोधनपर लेख वृत्तपत्रात छापून येत असतात. यामधून विद्यार्थी पालक गुरुजन यांना अप्रत्यक्ष एक हक्काचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. याचा सकारात्मक विचार करण्यास आपण दैनिक पेपर चे वाचन हे केलेच पाहिजे यातून आपल्याला प्रोत्साहन मिळते देश-विदेशात घडणाऱ्या समाजाला पोषक ठरणाऱ्या विविध घटना तसेच देशात उद्भवणारी भीषण परिस्थिती आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे निकाल आपण ज्या जिल्ह्यात वास्तव्य करतो त्या जिल्ह्यातील शासनाच्यावतीने जनतेसाठी जनहिताची झालेली निर्णय एखाद्या समस्येला जर जिल्हा सामोरे जात असेल तर ती परिस्थिती दुसऱ्यांदा उद्भवणार नाही यावर उपाय योजनांचा सारांश जर आपल्याला स्वतः दररोजची माहिती जाणून त्याची जाणीव करून घ्यावयाची असेल तर आपण दररोज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करणे आवश्यक आहे.
वृत्तपत्राचे नियमित वाचन केल्याने आपल्याला विविध विभागाची माहिती संकलित करता येते. यामुळे एखाद्या शासकीय पदावर शासनाचा कर्मचारी ,अधिकारी वर्गाची नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी परीक्षा घेतली जाते एखादा पदाची परीक्षा घ्यायची म्हटली म्हणजे त्यामध्ये जनरल नॉलेज वरती प्रश्न विचारत असतात. या परीक्षांमधील हे प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनाच्या परिस्थितीशी काही बाबतीत समरस असतात त्यामुळेच पेपर मधील माहिती प्रश्न असो वा उत्तर देशाची सध्याची परिस्थिती प्रसंगावर आधारित प्रश्न विविध जागतिक दर्जाच्या खेळ प्रकाराच्या स्पर्धांचे निकाल आर्थिक विकास दरांमध्ये असणारा चढ-उतार यावर आधारित प्रश्न त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना विचारले जातात आपण परीक्षार्थी म्हणून विविध प्रश्न सोडवतो कारण आपण अनेक प्रकारच्या प्रकाशकांची पुस्तके बाजारात आलेली असतात त्यांचे वाचन करतो परंतु या पुस्तकांमध्ये मागील काही कालावधीत झालेल्या घडामोडी ह्या प्रश्न उतार्याच्या माध्यमात दिलेल्या नसतात मग जर आपल्या यावर मात करून एखादी स्पर्धा परीक्षा पास करावयाची असेल तर आपण दररोज नित्य नियमाने दोन ते चार राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय वृत्तपत्रांचे वाचन केल्यावर घडणाऱ्या विविध विषयांवर रुपी घटना, प्रसंग,स्पर्धांचे निकाल, हे आपल्या वृत्तपत्र वाचनाच्या सवयीने आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा नकळत परंतु कासवाच्या गतीने तरी तो करीत असतो. याच माध्यमातून आपल्याला एका उंच शिखरावर जाणारा यशस्वी मार्ग वृत्तपत्राच्या दैनंदिन वाचनातून आपणास प्राप्त होईलच असे वाटते. यासाठी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करणे आवश्यक आहे आपला देश हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे आपल्या देशाच्या राजकारणात दररोज लोकहितवादी स्वरूपाचे अनेक निर्णय घेतले जातात. शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती ही दिल्लीवरून देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र करीत असतात. संसद भवनातील घडलेल्या संपूर्ण घटनांच्या घडामोडींचा तपशीलवार लेखाजोखा हा वृत्तपत्रातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम वर्तमानपत्र करतात. यावरून आपला देश कोणत्या प्रवाहाकडे वाटचाल करीत आहे याची कल्पना जनसामान्य माणसाला वृत्तपत्रातून केलेल्या वाचनामुळे समीक्षा करण्यास कोणत्याही प्रकारचा दुजाभाव त्याच्या मनात निर्माण होत नाही आपल्या देशाची आर्थिक वाटचाल कशा स्वरूपात चालू आहे तथा आर्थिक धोरणांमध्ये कोणकोणत्या बाबींचा सहभाग नव्याने करण्यात येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणांच्या तुलनेत आपल्या देशाची अवस्था परिस्थिती अशा स्वरूपाची आहे, याची संपूर्ण माहिती आपल्याला दररोज वृत्तपत्राच्या वाचनातून मिळवता .येते इतिहासात घडलेल्या अनेक प्रसंगांची माहिती आपल्याला नसते, परंतु जर एखाद्या प्रसंगाच्या विषयी एखाद्या तारखेला त्या प्रसंगात एखादी महत्त्वाची घटना घडली असेल तर ती गोष्ट युवकांना समजली पाहिजे त्यासाठी त्या प्रसंगाचे संपूर्ण चित्रण हे एखादा इतिहासकार अभ्यासातून लिखाण केल्यावर ते वृत्तपत्रात प्रसिद्ध करीत असतो यामधून ती माहिती आपल्याला वाचनातून संकलित करता येत असते भारत सरकारच्या वतीने आपण वास्तव्यास असणाऱ्या एखाद्या राज्याच्या वतीने समाजहितकारक उपक्रम राबविला जाणार असेल तर त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्रांच्या साह्याने त्यांची जाहिरात प्रकाशित करून त्याचे महत्त्व इतरांना सांगितले जाते.
याच माध्यमांच्या सहाय्याने समाजातून याला चांगला प्रतिसाद दिला जातो.स्रीभृण हत्या, पर्यावरणाचा समतोल, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी सारख्या विविध समाज प्रबोधनाच्या जाहिराती वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केल्या जातात त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतो या प्रक्रियेतून आपण स्वतः एक प्रवासी असल्यास आपणही वृत्तपत्राचा वाहक म्हणून दृष्टिकोन बाळगला तर यांच्या माध्यमातून आपल्या ला आपल्या स्वतःच्या मनात अनेक स्वरूपाच्या माहितीची भर पाडता येते, यासाठी आपण सर्व दैनिक दैनंदिन वृत्त पत्राकडे आपला जवळचा सखा आपला प्रबोधनकार म्हणून पाहणे महत्त्वाचे वाटते.
लेखक-प्रशांतराज तायडे (सर)
मु. पो.कर्की ता. मुक्ताईनगर
जि. जळगाव,मो. न.९६६५८३१५१