<
भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल्याने अनेकांना २ वेळच जेवण सुद्धा न मिळयाण्याने उपासमारीची वेळ येते, त्यामुळे अनेक जण खेड्यात व शहरात अनेक छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. दिवसभर मोलमजुरी,जड काम करून आपल्या परिवाराचि पोटाची भूख भागविणार्या घटकांस मजूर म्हणतात. आपल्या बायका मुलांना २ वेळच जेवण खाऊ घालण्यासाठी मजूर आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. व मिळेल ते काम करतो व संध्याकाळी आपल्या मुलांना खायला जेवण देतो.
मजुरांचे शहरापेक्षा जास्त प्रमाण व महत्व खेड्यात दिसून येते. त्यात प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी मजुरांचे महत्व जास्तच. शेती व शेतकरी यांना जोडून ठेवणारा महत्वाचा दुवा ( घटक) म्हणजे मजूर. मजुरांशीवाय शेतीची कामे पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे शेती क्षेत्रात मजुरांचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकाळी ८ वाजता पासून ते संध्याकाळी ४-५ वाजातपर्यंत पुरूष व स्त्री माजून शेतात काम करतात व आपल्या कामाचा मोबदला म्हणून पुरुष २००₹ तर स्त्रीया १००₹ रोजदारीवर काम / मजुरी करतात. फारच हलाखीची परिस्तिथीत 2 वेळच जेवण मिळणच मुश्किल तर मुलांना चांगले कपडे व शिक्षण कसे देणार याच विचारात मजुरांचे पूर्ण आयुष्य निघून जाते.
आमचं गाव ( शेमळदे ता. मुक्ताईनगर जी. जळगाव) १३०० लोकवस्तीचे गाव . परिसरात शेती हाच प्रमुख व्यवसाय सर्वच छोटे-मोठे शेतकरी करतात. शेतील हंगामी पीक घेतली जातात जसे ज्वारी , मका , गहू , कपाशी , केळी , हरभरा , भाजीपाला ह्या पिकांचं उपन्न घेतात. उपन्न भरघोस घेण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी, शेतात मेहनत करण्यासाठी मजुरांची पहिल्यापासून तर शेवट पर्यंत उपयोगात घेतला जातो.
परराज्यातील मजूर शेतकऱ्याची आयात
धनवान शेतकरी आपली शेतीची कामे लवकर व्हावी व आपल्या शेतीवर कायम नजर राहावी यासाठी परराज्यातून वंजारी, पवार, कोतील, कोरकी , भिल आदी भटक्या जमातीची कुटुंबे शेतात वास्तव्यासाठी आणली आहेत. त्यांच्या कुटुंबाणा शेतातच शेळ करून त्यांना तिथेच ठेवल जाते. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाल्यामुळे भटक्या जातीच्या लोकांना राहण्यास घर मिळते, पैसे मिळतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो , 12 महिने हाताला काम मिळते व शेतकऱ्याला आपल्या शेती कामात सुलभता होते.
परिसरातील स्थानीक मजूर हे पावसाळ्यात दुप्पट वेगाने ( गतीने) करून बाकी 6 महिने आरामात काम करतात. त्यामळे त्यांचा वर्षे भराची जेवणाची व संसार उपयोगी वस्तूंची सोय होते. मजुरांना पावसाळा म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीच. पावसाळ्यात शेतीची सर्वच कामे म्हणचे , पेरणी , निंदणी, लावणी आदी कामे यंत्राच्या साहाय्याने होत नाही. त्यामुळे मजूर हाच एकमेव पर्याय उरतो जो ही कामे करतो. पावसाळ्यात शेती मशागतीची कामे मजुरांशीवाय अश्यक्यच असतात. मजुराशिवाय कामे होतच नाही. पावसाळ्या कामे जास्त व मजूर कमी अश्यातच मजुरांकचिऊनिव भासते .
मजुरांची आयात
मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी आपली शेतीची कामे लवकर व्हावी म्हणून छोटे-मोठे शेतकरी मजूरांच्या मागे धावतात या वेळेत देव भेटेल पण मजुरच लवकर भेटत नाही . म्हणून शेतकरी परिसरातून व तालुक्यातुन ज्यादा पैसे देऊन मजुरांची आयात करतात . मजुराना शेतीची कामे करण्यासाठी सकाळी ट्रॅक्टर, बैलगाडी, रिक्षा, जीप आदी वाहनातून आनले जाते व काम संपल्यावर परत सोडून देण्यात येते. पावसाळ्यात मजूर भेटत नाही त्यामुळे शेतकरी मजुरांना आपल्या शेतात आणण्यासाठी चढाओढ करीत असतात. मजूर सुद्धा पावसाळ्यात आपला भाव(दर) वाढवितात. त्यामुळे पावसाळ्यात मजुरांची खऱ्या अर्थाने दिवाळीच असते. आपला वर्षभराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मजूर गहू, ज्वारी, डाळ आदी लागणार धान्य मजुरीतुनच कमावून ठेवतात . उन्हाळयात शेतीची कामे नसतात त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येते व पैश्याची उणीव भासते पण कमावलेलं धान्य उदर भरण्यासाठी उपयोगी येतो त्यावरच प्रपंच चालवतात , हे एक दूरदृष्टी च उदाहरण म्हणता येईल
लेखक:- आकाश भालेराव
( मु. शेमळदे पो. मेळसांगावे ता. मुक्ताईनगर जी. जळगाव)
मो.नं . ८८०६७८२६१०