<
एरंडोल(प्रतिनीधी)- तालुक्यात एरंडोल उर्दू व मराठी केंद्राची टॅग व मुक टीचर्स मिटींग आयोजित करण्यात आली होती. तसेच तेजस प्रकल्प आणि मुक आँनलाईन उपक्रम शिक्षक आणि शिक्षण समृद्धी साठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे नुतन शिक्षण विस्तार अधिकारी जे. डी. पाटिल यांनी केले. यावेळी एरंडोल मराठी केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण बोरसे, एरंडोल येथील गटसाधन केंद्राचे योगेश कुबडे,महाराष्ट्र राज्य शासन टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिल च्या वतीने औरंगाबादच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झालेल्या तेजस प्रकल्प एरंडोल तालुक्यातील टॅग व मुक कॉर्डिनेटर जि.प उच्च प्रा.शाळा गालापूर येथील शिक्षिका जयश्री पाटील, एरंडोल उर्दू केंद्राचे टॅग कॉर्डिनेटर शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आदींची उपस्थिती होती.विहित वेळापत्रकानुसार दर महिन्याच्या बुधवारी राज्यभर नियमितपणे तेजस प्रकल्पांतर्गत शिक्षकांच्या टॅग मीटिंग घेण्यात येत आहेत. एरंडोल उर्दू व मराठी केंद्रातील टॅग टीचर्स ची मिटिंग व MOOC मीटिंग ११ते ४ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सुरुवातीला शिक्षण विस्ताराधिकारी जे.डी.पाटील यांनी इंग्रजी विषयाचे महत्त्व व ऍक्टिव्हिटी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी एरंडोल मराठीचे केंद्रप्रमुख नारायण बोरसे, तेजस व MOOC राज्यस्तरीय प्रशिक्षण घेऊन आलेल्या तेजस प्रकल्पाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणार्थी टॅग व MOOC एरंडोल तालुक्यातील कॉर्डिनेटर जयश्री पाटील,एरंडोल तसेच तेजस प्रकल्प एरंडोल उर्दू केंद्राचे टॅग कॉर्डिनेटर किशोर पाटील कुंझरकर यांनी शिक्षकांना टीचर ॲक्टिविटी ग्रुपच्या माध्यमातून करीत असलेले कार्य तसेच इंग्रजी ऍक्टिव्हिटी घेतल्या. तालुक्यातील उर्दू केंद्र व मराठी केंद्र या दोन्ही केंद्रातील टॅग व MOOC टीचर्स शिक्षक शिक्षकांची उपस्थिती होती. एरंडोल नुतन शिक्षण विस्ताराधिकारी जे.डी.पाटील तालुक्यात नव्यानेच हजर झाल्याबद्दल त्यांचे टॅग टीचर्स व कॉर्डिनेटर च्या वतीने शाल पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.टॅग कॉर्डिनेटर जयश्री पाटील व किशोर पाटील यांनी वेळापत्रकानुसार ऍक्टिव्हिटी ऑनलाइन व इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण दिले. टीचर्स रि सोर्स बुक इयर टू पुस्तकांचे वितरण जे.डी.पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांना यावेळी करण्यात आले. ११ते २ या वेळेत टॅग मिटिंग संपन्न झाली. नंतर MOOC ऑनलाइन कोर्सच्या संदर्भात अपलोड च्या संदर्भात कॉर्डिनेटर जयश्री पाटील यांनी २ते४ या वेळेत कृतीयुक्त मार्गदर्शन केले.सदरील प्रकल्पाविषयी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना टॅग कॉर्डिनेटर किशोर पाटील कुंझरकर, टॅग व मुक कॉर्डिनेटर जयश्री पाटील म्हणाले की, इंग्रजी भाषा आत्मविश्वास वाढीसाठी वशिक्षण समृद्ध करण्यासाठी व शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी ही सुवर्णसंधी रीजनल अँकॅडमिक अथोरिटी औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद ने निर्माण करून दिली असून आमच्यासारख्या सर्व कॉर्डिनेटर आम्हाला वेळोवेळी रीजनल अँकॅडमिक अथोरिटीचे डायरेक्टर डॉ.सुभाष कांबळे, रणजित देशमुख,उज्वल करवंदे, तेजस प्रकल्पाचे समन्वयक डॉ.प्रमोद कुमावत, प्रमोद गंगावणे, संतोष गायकवाड, सुरेंद्र करवंदे, प्रकाश वाघमारे, सुचिता मोहरकर, डी.आय.ई.सी.पी.डी जळगावच्या प्रा.डॉ. मंजुषा क्षीरसागर, इंग्रजी जिल्हा प्रमुख अधिव्याख्याता विद्या बोरसे तसेच अमृता भालेराव, राजु कोरडे ,निसार शेख,अशोक चव्हाण, संदीप उदावंत आदींचे तसेच सर्व टॅग व मुक कॉर्डिनेटर व टीचर्स आदींचे सहकार्य लाभत आहे . राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार ॲडिशनल चीफ सेक्रेटरी डॉ.वंदना कृष्णा, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्याचे रिजनल अँकॅडमिक अथोरिटी औरंगाबादचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.उज्वल करवंदे आदींचे थेट मार्गदर्शन लाभत असल्याचे टॅग कॉर्डिनेटर किशोर पाटील कुंझरकर यांनी सांगितले.जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी व इंग्रजी विषयाच्या संदर्भात समृद्ध दालन निर्माण व्हावं यासाठी या पथदर्शी उपक्रमाचा शिक्षण क्षेत्राला लाभ होत असल्याचे यावेळी बोलताना जयश्री पाटील व किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.राज्यातील प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक व टीचर्स यांची इंग्रजी विषयाच्या संदर्भात समन्वयातून मोठी विधायक कार्याची साखळी व टीम या माध्यमातून तयार होत आहे. टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातूनही शिक्षक एकमेकांच्या कल्पना एकमेकांना विचारविनिमय करून शेअर्स करत आहे, तेजस प्रकल्प दुसऱ्या वर्षात पोहोचला असून स्पोकन इंग्लिश प्रोग्राम ची सुरुवात राज्यभर झाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना इंग्रजी विषयाच्या संदर्भात समृद्ध करणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सदरील पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्रा.डॉ. मंजुषा क्षीरसागर, इंग्रजी विषयाच्या प्रमुख विद्या बोरसे व त्यांचा सर्व सहकारी स्टॉप, जिल्ह्याचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे ,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. डी एम देवांग,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी,शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील, जे.डी. पाटील, सर्व केंद्रप्रमुख यासंदर्भात टॅग कॉर्डिनेटर व टीचरला सहकार्य करत आहेत. अशी माहिती महाराष्ट्र शासन टाटा ट्रस्ट ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने ऑनलाइन मुलाखाती द्वारा तेजस प्रकल्पासाठी तालुक्यातून निवड झालेले टॅग कॉर्डिनेटर तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली.