<
धरणगांव(प्रतिनीधी)- दिनांक ९/९/२०१९ वार सोमवार सकाळी १०वा. अपंग कार्यालय धरणगांव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात अपंगाच्या समस्या विषयी माहिती देण्यात येणार आहे. अपंगांचे स्वालंब कार्ड म्हणजे काय? प्रत्येक अपंग बंधू-भगिनींना कार्ड बंधनकारक आहे. अपंग बंधू-भगिनींसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. महिलांसाठी शिवण क्लास शासनामार्फत घेण्यात येणार असून त्यांना मानधन देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड असून धान्य मिळत नाही तसेच त्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीतील अपंग बंधू-भगिनींना त्यांची शिफारस घेऊन आपल्याला अंत्योदय योजनेत नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. अपंगांना ३टक्के निधी ऐवजी ५टक्के निधी मंजूर केला आहे. त्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच नगरपालिका, पंचायत समिती, व तहसील कार्यालय यांना विविध विषयांवर निवेदन देण्यात येणार आहे. तरी धरणगांव तालुक्यातील सर्व अपंग बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.