<
तरुण हा देशाचा अभिमान व देशाची महान संपत्ती आहे,सुशिक्षित व उद्योगी तरुण राष्ट्रीय सपत्तीचाच एक भाग आहे. महाराष्ट्रात जळगांव जिल्हा हा सर्वाधिक प्रगल्भता, सातत्यपूर्ण अभ्यासू, प्रशासकीय आणि राजकीय सेवेत असंख्य तरुण नेतृत्व देणारा एकमेव जिल्हा आहे.मात्र गेल्या दहा वर्ष्याच्या जळगांव जिल्हा विकासात येथील सुशिक्षित बेरोजगारिचा प्रश्न, तरुण राजकीय राजकारणी बनण्याचा प्रश्न,आणि जिल्हयात सर्वांगीण विकास धोरणात तरुणाचे होणारे दुर्लक्ष आदी बाबीवर नजर टाकता येथील तरुण हतबल,लाचार,आणि निराश झाला असल्याचं दिसून येतं. राजकारणी नुसते निवडणूक जवळ येताच वरील प्रश्नावर भाषण देणे, अश्वासन देणे आणि फार फार तर बेरोजगार मेळाव्याच आयोजन करतात व आपली पोळी शेकून निघून जातात असे आहे।तर काही तरुणीच्या व तरुणांच्या स्वप्नांना विकत घेत येथील रोजगार देणारे शासन सुशिक्षिताचे नुकसान करत असल्याचं समोर आले आहे तरी, जिल्ह्याच्या विकासात आपल्याला काहीतरी करावे वाटते ,नव्हे केलं पाहिजे.काही तरुण जळगांव चा विकास करायचा म्हणून नुसत्या गप्पा मारताना दिसतात.
त्याच बरोबर काही तरुण एकट्याने काय होणार म्हणून नकारात्मक पवित्रा घेतात.
जळगांवात कमतरता शोधनारांनी काय केलं म्हणजे विकास होईल असा तेढ निर्माण करू नये,धम्मक असेल तर स्वप्नातील जळगांव नक्कीच बनवू शकेतो हा विश्वास मनात ठेवला पाहिजे. यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, इतरांची प्रेरणा व आदर्श शोधण्यापेक्षा स्वतःच एक आदर्श होण्याचा पर्यन्त केला पाहिजे.
जळगांव च्या राजकारणात, प्रशासनात कुणी तरी एक प्रामाणिक माणूस आपल्या तरुणांसाठी काही तरी करेल कसे तरी आम्हाला या बेरोजगारीतून बाहेर काढेल अश्या आशेवर अनेक तरुण-तरुणी जगत आहेत, हे परावलंबी पणाचे लक्षण आहे. कुणीतरी नाही तर स्वतःला गुणवत्तेच्या आणि अनुभवाच्या जोरावर बेरीजगारी साठी प्रयत्न केले पाहिजे.
जळगावतील बेरोजगार तरुण तरुणींच्या ओठावरील प्रश्न, त्यांच्या अडचणी व या भयावह परिस्थितीस येथील स्थानिक राजकीय लोकांचं पाप,चोर व भ्रष्ट अधिकारी,आणि हातावर घडी तोंडावर बोट धरणारा मतदाता आहे. त्यांच्या आणि हे निष्क्रिय तेच देणं आहे. जिल्ह्यातून राजकीय ,सामाजिक, धार्मिक,आर्थिक आणि बेरोजगार मुक्त विकास हवा असल्यास सर्व तरुण वर्गाने इथला इतिहास न विसरता मतदानाचा हक्क प्रामाणिक आणि स्वाभिमाने व भविष्यातील नांदी म्हणून बजावला तर आजची उद्याची बेरोजगारी आपण थाबवू शकतो हे ही तेवढंच खरे आहे जेवढं सुर्यप्रकाश आहे.
मतदानाचा योग्य वापर करून निवडणुकीरून प्रामाणिक व प्रतिनिधी,सेवक,अधिकारी निवडून किंवा स्वतःच्या राजकीय पायवाटेने सुरवात करत राजकारणात यायला पाहिजे, अश्या संधी साधून आपल्या बेरोजगारीवर लढा दिला पाहिजे. राजकारणात, समाजकारणात प्रवेश करून आपण आपले गाव,तालुका,शहर,पर्यायी राष्टात बदल घडवू शकतो. स्वताःवर विश्वास ठेवून बदलाला सुरवात केल्यास काही हरकत नाही. बेरीजगारीच्या या खायीतुन सुशिक्षित बेरोजगारांनी बाहेर पडण्यासाठी आपली कंबर कसून जागे व्हावे, म्हणजे समोर “आ” करून उभा असलेला बेरीजगारिचा प्रश्न सुटेल.
डॉ धर्मेश पालवे
7276490167
लेखक- सत्यमेव जयतेच्या जळगांव जिल्हा प्रतिनिधी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत