Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

चाळीसगांव(प्रतिनिधी)-  येथील राजपूत समाज मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात पंचायत समितीच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी चाळीसगाव पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळे मधील केंद्रनिहाय, आश्रम शाळा, माध्यमिक शाळेतील शिक्षक नगरपालिका शाळा मधील मुख्याध्यापक,  शिक्षक बंधू-भगिनींना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी उपस्थित शेकडो शिक्षक बंधूंनी समाधान व्यक्त केले व सभापतींचे अभिनंदन केले. याप्रसंगी १९० शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले. तसेच ३०आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार देण्यात आले.तालुक्याचे भूमिपुत्र असलेले व सातत्याने शिक्षण व समाज व्यवस्थेसाठी शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनाही विशेष आमंत्रित करून त्यांचा पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील  ७६ ग्रामपंचायती मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के.बी. साळुंके यांना  देण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ.संपदाताई उन्मेश पाटील, पं.स. सदस्य अजय पाटील,  भाऊसाहेब पाटील,  सुभाष पाटील,  विष्णु चकोर सर, शिवाजी सोनवणे, पियुष साळुंखे, माजी जि.प. सदस्य साहेबराव तात्या साळुंके, नगरपालिका गटनेते संजू आबा पाटील, राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्यसमन्वयक शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, बीडिओ अतुल पाटील,गटशिक्षणाधिकारीविलास भोई, शिक्षक संघटना चे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जे राज्यस्तरावर आहेत ते शासनाने लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच शिक्षणाची उदिष्ट  माणूस निर्माण करणे असून शिक्षक देखील माणूस आहे, त्यांना समजून घेण्यासाठी गाव पातळीवर व जेथे असेल तेथे जिल्हा परिषद व इतर शाळांच्या शिक्षकांना सर्वांनी जीव लावावा. आपला देश समृद्ध व महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले .पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे पुरस्कार घेताना अश्रू अनावर झाले अनेक शिक्षकांनी सपत्नीक सत्कार स्वीकारला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी विलास भोई, शिक्षण विस्ताराधिकारी आर डी महाजन सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षण विभागातील व पंचायत समितीतील सर्व खात्यांचे कर्मचारी अनेक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शासनाच्यावतीने कोणतेही अनुदान न घेता सभापती सौ.स्मितलताई बोरसे,  माजी पं.स. सदस्य दिनेश बोरसे यांनी स्वखर्चातून कार्यक्रम यशस्वी केला. स्मितलताई बोरसे, सौ. संपदा पाटील, नगरपालिकेचे गटनेते संजय राजपूत, दिनेश बोरसे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, आदींनी मनोगतातून शिक्षक व शिक्षणाविषयी गौरव व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे यांनी आदर्श शिक्षक व सर्व शिक्षक भरती समाजात कायम आदरभाव असून अशा कार्यक्रमाने तालुक्याची उंची वाढल्याचे म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब वाघ यांनी केले तर सर्वांचे आभार पं.स.सभापती स्मितल बोरसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या ऐतिहासिक कार्यक्रमाची सांगता झाली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

Next Post

स्व. कांताबाई जैन यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त 549 सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान

Next Post

स्व. कांताबाई जैन यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त 549 सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo