<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील २००० हुन अधिक सामाजिक संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या महा एनजीओ फेडरेशनची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली . जिल्ह्यात सामजिक कार्याच्या अनुषंगाने मोठे योगदान महा एनजीओ फेडरेशनने दिले आहे. संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जे जे शक्य त्या सर्व कार्यशाळा घेण्याचे नियोजन सुरु आहे असे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले यांनी केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामाजीक संस्थांना योग्य ते मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमातून भेटणार आहे. कार्यशाळेसाठी महा एनजीओ फेडरेशन कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारात नाही अशी माहिती ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी दिली. संस्थांचा सर्वांगीण विकास ही एकमेव गोष्ट संस्थेचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या माध्यमातून महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्रभर राबवत आहे . सामजिक संस्था व महिला बचत गट यांच्या द्वारे निर्मित वस्तू विक्रीसाठी महा एनजीओ फेडरेशन ई कॉमर्स साईटचा मोठा प्लॅटफॉर्म लवकरच सुरु करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांचा सीएसआर जिल्ह्यातील संस्थांना व ज्या ठिकाणी या कंपनी कार्यरत आहे तेथील स्थानिक सामजिक संस्थाना मिळावा यासाठी महा एनजीओ फेडरेशन पाठपुरावा करेल अशी ग्वाही भोसले यांनी दिली .
आज पावेतो कोट्यवधी रुपयांची मदत महा एनजीओ फेडरेशनने सामाजिक संस्थांना केली आहे व यापुढे ही मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत . जळगाव जिल्ह्यातील बहुतांश सर्वच सामाजिक संस्था या बैठकीस उपस्थित होत्या. संस्थांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे भोसले यांनी देत .जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी वर्गास उत्तम सुविधा युक्त अभ्यासिका व ग्रंथालय महा एनजीओ फेडरेशन उपलब्ध करुन देणार आहेत अशी माहिती देखील यावेळी उपस्थित संस्थांना देण्यात आली. जळगाव जिल्हा मोठ्या असल्याने संस्था प्रतिनिधी नरेंद्र पाटील सर व हर्षाली चौधरी यांच्याकडे संयुक्तिक रित्या संस्थेच्या जळगाव जिल्हा समनव्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शासनास सहकार्य करणे हेतू महा एनजीओ फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावी जाऊन शाळा व महाविद्यालयात कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करुन प्रबोधन करण्यात येणार आहे.