<
चाळीसगांव-(प्रमोद सोनवणे) – वनविभागाच्या काही अधिकारी आणि कर्मचान्यांच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या वृक्षतोड सुरू आहे. वृक्षतोडीचा माल शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या व शहरी भागातील विविध वखारींमध्ये विकत घेतला जातो.
या अवैध वृक्षतोडीसाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व राजकीय क्षेत्रातल्या काही दलालांना मोठ्या प्रमाणावर बिदागी दिली जाते. प्रामुख्याने शहर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारीही या अवैध वृक्षतोडीशी संबंधीत लोकाशी लागेबांधे ठेवून आहेत. पोलीसही ट्रॅक्टर पकडतात आणि चिरीमीरी घेवून सोडून देतात. प्रामुख्याने पातोंडा, बाघळी, खरजई, तरवाडे, उबरखेड मेहुणबारा जामदा भवाई व शहरातील गणेश रोड वरील वखारी व नागद रोड वरील वखारी मध्ये अवैध वृक्षतोडीचा माल वखारीमध्ये येतो. टाकळी प्र.चा. गावाच्या वखारीतही व पातोडा येथील वखारीत तो माल खाली होतो.व मालेगाव येथे ट्रका भरुन लाकुड जाते या ठिकाणी स्वतः ग्रा.पं.चे सदस्य म्हणविणारे काही आडदांड अवैध वृक्षतोडीशी संबंधीत लोकांना साथ देतात आणि त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी करणाऱ्यांना दमबाजी करतात