<
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व प्रवर्तन फाउंडेशन, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड येथे आत्मनिर्भर भारत ही कार्यशाळा गटशिक्षणाधाकारी सभागृहात संपन्न झाली.
कार्यशाळेचे अध्यक्षियस्थान पोलीस निरीक्षक मा. श्री.राजेंद्र गुंजाळ सर व प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी मा.श्री. बि.एल.लाहासे व औ.प्रशिक्षन संस्थाचे मा.श्री. के.जे.सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवर्तन फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. दिव्या पालवे तर प्रमुख वक्ते म्हणून मुकेश सावकार, प्रवीण नायसे , विजयेंद्र पालवे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना परिस्थितीचे भान राखून आपल्या आयुष्यात जागृत राहणे महत्वाचे आहे. सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करून आपली होणारी लूट, ब्लॅक मीलींग, बदनामी व वेळेचा होणारा दुरुपयोग टाळावा असे विद्यार्थ्यांना संबोधित केले.
गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. लाहासे सर यांनी कुठलेही शिक्षण घ्या परंतु मनापासून घ्या, शिक्षण स्वतःत उतरवा त्यात प्रगल्भ व्हा अशाप्रकारे विद्यार्थ्यांना अनुभवांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
औ. प्रशिक्षण संस्था येथिल श्री. के.जे.सोनवने सर यांनी कुठल्याही व्यवसायाची सखोल माहिती घेऊन एखाद्या व्यवसायात खचून न जाता निपून होण्याचं कौशल्य निर्माण करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
वक्ते प्रवीण नायसे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात जगताना उच्चतम पातळीचा अभ्यास करण्याची गरज आहे,हे त्यांनी विविध दृष्टांत स्वरूपात सांगुण विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
वक्ते मुकेश सावकारे यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत ही योजना व संकल्पना समजावून सांगितली . या योजनेतून भारत सरकारचा उद्योजकते विषयीचा निर्णय किती महत्त्वपूर्ण आहे. हे स्पष्ट केले.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट विजयेंद्र पालवे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य विषयी विविध प्रकारचे सल्ले दिले.
दिव्या पालवे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले .
कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी श्री.नरेंद्र डागर व लेखापाल श्री.अजिंक्य गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी किशोर पालवे ,सुरज पाटील ,निखिल वाघ ,राहुल वाघ, विहारा पालवे,अमोल पाटील, तनिषा पालवे ,ज्योती पालवे, दिलीप पौळ ,अर्जुन हासणे, अस्मिता अवचारे, अक्षय पाटील,सागर गुरचळ यांचे सहकार्य लाभले.