<
भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. अविनाश नामदेव भंगाळे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विज्ञान विद्याशाखेतील प्राणिशास्त्र विषयातील पीएच.डी. (आचार्य) पदवी जाहीर केली. त्यांना विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ.बी.व्ही. पवार यांच्या हस्ते नोटिफिकेशन देण्यात आले. प्रा. अविनाश भंगाळे यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “Histopathological and Histochemical Studies of Capra Hircus Intestine Infected By Cestode Parasites From Bhadgaon And Pachora Region.” (“हिस्टोपॅथॉलॉजिकल ॲन्ड हिस्टोकेमिकल स्टडीज ऑफ कॅपरा हिरकस इंटेस्टाईन इन्फेक्टेड बाय सिस्टोड पॅरासाइट्स फ्रॉम भडगाव ॲन्ड पाचोरा रिजन”) हा होता. त्यांना या संशोधनासाठी चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख व सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ प्रा.डॉ. अजित कळसे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा.अविनाश भंगाळे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.