<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक माध्य. विद्यालय आव्हाने शिवार जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आले. प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. संपूर्ण जगात अधिराज्य गाजविणारे, महापराक्रमी राजे शिवछत्रपती महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवबा जन्मोत्सव, माॅसाहेबांची शिकवण, विवाह सोहळा, शिवराज्याभिषेक,अफजल खानाचा वध इ. सजीव देखाव्यात प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रम जणू इतिहास साक्ष देणारा ठरला. यात इ.1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिव विचार मांडले.इतिहास शिवकालीन वेशभूषा धारण विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रम द्विगुणित केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हर्षाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा मा.ग.स.अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्राथ.मुख्याध्यापिका सौ.हर्षाली पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शिंदे, संगीता देशमुख ,जयश्री पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे दीपमाला बाविस्कर, दिशा पाटील, प्रज्ञा तायडे,राहुल पाटील, सद्दाम तडवी, पवन पाटील, विपुल पाटील, संदीप मोरे, प्रसन्न कोळी,आदी सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते.