<
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले–समतादूत : अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी
जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या समृतिदिनानिमित्त सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग व बार्टीतर्फे आदरांजली व अभिवादन करण्यात आले. आरक्षणाचे जनक, सामाजिक सुधारणांचे शिरोमणी, विधवा व स्त्री मुक्तिचे पुरस्कर्ते, जातीभेद, अंधश्रध्दा, आणि सामाजिक सुधारणांचे शिरोमणी, विधवा व स्त्री मुक्तिचे पुरस्कर्ते, जातीभेद, अंधश्रध्दा, आणि सामाजिक विषमतेचे कर्दनकाळ, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, शिष्यवृत्ती लागू करणारे, वसतीगृहांची स्थापना करणारे, शिवछत्रपतींचा वारसा पुढे नेणारे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणारे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना सहा. आयुक्त समाज कल्याण विभागाचे योगेश पाटील यांनी प्रतिमा पूजन करुन माल्यार्पण केले यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्तभ उभे राहून आदरांजली वाहीली
या कार्यक्रमास सहा. आयुक्त समाज कल्याण विभागाचे योगेश पाटील, वरीष्ट समाज कल्याण निरीक्षक आर.डी. पवार, अधिक्षक समाज कल्याण विभागाचे वाणी, निरीक्षक, समाज कल्याण विभागाचे महेंद्र चौधरी, समतादूत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव, अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, जातपडताळणी प्रमाणपत्र विभागाचे आबा पाटील, व्यवस्थापक अण्णा भाऊ साठे महामंडळ विभागाचे एस.एन. तडवी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व तालुका समन्वयक उपस्थित होते. असे समतादूत अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.