<
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. जगप्रसिद्ध कवी व नाटककार शेक्सपिअर यांची जयंती जगभर आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा दिवस म्हणून साजरी केली जाते. इंग्रजी विभागातर्फे भित्तिपत्रक प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भित्तीपत्रक सादर केले.
स्पर्धेचे उद्घाटन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल. जी. कांबळे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत कु. अश्विनी सुनील पाटील (तृतीय वर्ष कला) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवला. कु. विद्या कोमल वाघ (द्वितीय वर्ष कला) या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर कु. रेणुका मांगो पवार (प्रथम वर्ष कला) या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांक मिळाला. प्रा. एल. जी. कांबळे व डॉ. एन. व्ही. चिमणकर यांच्याकडून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. जनार्दन देवरे यांनी केले.
धनश्री विजय सोनवणे, हेमांगी संभाजी सूर्यवंशी, पूजा वाल्मिक पाटील, नेहा संजय भोई, अश्विनी विनोद इंगळे, करिष्मा राजू तडवी, जयश्री संजय खैरनार, दिव्या वाडेकर, धनश्री चंद्रकांत भालेराव, भाग्यश्री सोनीराम बागूल, नेहा संजय सोलसे, आरती राजेंद्र पाटील, विशाल कोळी या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.