<
जळगांव(प्रतिनीधी)- योग फेडरेशन आँफ इंडिया व एशियन योग फेडरेशन द्वारा दक्षिण कोरीयात येसू येथे कोरियन योग फेडरेशन ने आयोजित केलेल्या ५ ते ८ सप्टेंबर ला पार पडलेल्या ९ व्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ओव्हरआँल जनरल चॅम्पियनशिप जिंकली. भारताकडून प्रत्येक वयोगटातील ४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता तर महाराष्ट्रातील ७ खेळाडूंचा सहभाग होता. डॉ. अनिता पाटील यांनी भारताकडून योग पंच म्हणून काम पाहिले. सर्व खेळाडू महाराष्ट्रात योग असोशिअन चे राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड होऊन योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले व तेथून ९व्या एशियन योग स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेचा कॅम्प पंचकुला हरियाणा किसान भवन येथे योग फेडरेशन ऑफ इंडिया व एशियन योग फेडरेशन चे अध्यक्ष अशोककुमार अग्रवाल व सिनिअर वरिष्ठ उपाध्यक्ष इंदू अग्रवाल यांनी आयोजित केला होता. त्या कॅम्पत भारतीय संघाला डॉ. अनिता पाटील, इंदू अग्रवाल, अशोककुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत श्रध्दा लढ्ढा वयाच्या १२व्या वर्षापासून माझ्या घरी परिवारातील सदस्य बनून सराव करत असे तसेच माझी मुलगी आंतरराष्ट्रीय योगपटू श्रध्दा पाटील सध्या फिलिपिन्स मध्ये शिक्षण घेत आहे. धुळ्याची आंतरराष्ट्रीय योगपटू योगेश्वरी मिस्तरी व आता श्रावणी पाचखेडे वयाच्या ८व्या वर्षापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगपटू बनण्याचे ध्येय व जिद्द ठेऊन परिवारातील एक सदस्य बनून राहून सराव करीत असतात, असे अनेक खेळाडू जळगांव मध्ये माझ्याकडे विनामुल्ये प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेत. तसेच योग प्रकारात पदके मिळवून योग प्रशिक्षण सार्थक केले.
तसेच जळगांवचा मास्टर तनय मल्हारा या विद्यार्थ्यांने डान्स प्लस या कार्यक्रमात रीदमीक या योगाचे सुंदर प्रदर्शन सादर करुन योगाला जागतिक स्तरावर विशेष डान्स व योगाचे फ्युजन सादर करुन एक नवा आयाम मिळवून देत खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. असे यावेळी डाँ. अनिता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील विजेते स्पर्धक –
१)तनवी रेड्डीच (११ ते १४ वयोगट)
२)श्रावणी पाचखेडे(१४ ते १७ वयोगट)
३)श्रेया कंधारे(१७ ते २१ वयोगट)
४)श्रध्दा मुंदडा(२१ ते २५ वयोगट)
५)धनश्री लेकूरवाळे(२५ ते ३५ वयोगट)
६)कविता गाडगीळ
७)चंद्रकांत पांगारे