<
जळगांव(प्रतिनिधी)- माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवन मायादेवी नगर जळगांव येथे मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याबाहेरील सुद्धा लाखो मधुमेह रुग्णांना रोगमुक्त आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवणारे व जीवनशैली संबंधित रोगांना काढून टाकण्याचा विडा उचलणारे माधवबाग सर्वाना परिचत आहे. मधुमेह झाला हे कळताच अनेकांना काळजी पडते ती पथ्य पाळण्याची,नियमित औषधे व इन्शुलीनची तसेच आता यातून मुक्ती नाही अशी मानसिकताच स्वीकारली जाते.ही मानसिकता बदलण्याचे गरजेचे असून स्व:साठी वेळ द्या तसेच आपला आहार-विहार-विचार यांच्या योग्य नियोजनाने मधुमेह आणि इतर आजारांवर मात करून चांगल जिवन जगता येत व मधुमेहा पासून निश्चित मुक्ती प्राप्त कराल असे डॉ.मिलींद सरदार यांनी यावेळी बोलून दाखविले. या वेळी डॉ. प्रशांत याकुंडी म्हणाले की,औषधे,गोळ्या न घेता,योग्य आहार,नियमित व ठराविक व्यायाम, तणावमुक्ती या सूत्रांचा वापर करून मधुमेह पासून मुक्ती मिळू शकते.
या मधुमेह मुक्ती कार्यशाळेत बर्याच जणांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कृतीफाऊंडेशनच्या कार्यध्यक्षा व माधवबाग चे संचालक डॉ. श्रद्धा माळी साध्या सोप्या व्यायामाद्वारे, कडधान्ये, सलाडचे जेवणात प्रमाण वाढवून हिरवी संजीवनी सेवन करून सांगितलेली पथ्ये पाळून मधुमेह मुक्ती निश्चित प्राप्त होईल, हा विश्वास डॉ.श्रध्दा माळी यांनी यावेळी दिला. यावेळी उपस्थितांच्या आरोग्य विषयक प्रश्नांचे आणि शंकाचे निरसन करुन माधवबागची कार्यपद्धती व जनजागृती बाबत अमित माळी यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित डॉ.श्रेयस महाजन यांनी मधुमेह पासून मुक्ती मिळेल, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत उपस्थित डॉ.मिलिंद सरदार- मुंबई, डॉ. प्रशांत याकुंडी- औरंगाबाद, डॉ.श्रद्धा माळी- जळगांव, डॉ. श्रेयस महाजन- जळगांव, अमित माळी, कृती फाऊंडेशनचे सचिव जि.टी.महाजन, फिजिओथेरपिस्ट डॉ.अमित जैसवाल उपस्थित होते.