<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- जिल्हयातील पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना – आंबिया बहार सन 2021-22 करीता अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली असुन अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजना ॲग्रीकल्चर इंन्सुरंन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयात या आठवडयात वेगाचे वारे/ वादळामुळे फळपिकाचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासात संबधीत कंपनीला कळविणे आवश्यक असते. या अनुषंगाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती कंपनीला तात्काळ कळविणे पंचनामे करुन घ्यावेत असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती अशी की माहे मे व जुन, 2022 मध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेष करुन केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश विमा कंपनी, महसुल व कृषि विभाग यांचे मदतीने वैयक्तिक पातळीवर करण्याचे आदेशीत केले.
तसेच दिनांक 8 व 9 जून, 2022 रोजी झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीची सुचना काही तांत्रिक कारणामुळे शेतकरी देवू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी दिनांक 15 जून, 2022 पर्यंत विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जावून नुकसानीचे सुचना क्रॉप इन्शुरन्स ॲपव्दारे करुन घेण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांचे फळपिकांचे दोनदा नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांचे दुसऱ्या नुकसानीची सुचना क्रॉप इन्सुरन्स ॲपव्दारे नोंद होत नसल्याने, त्यांनी विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात नुकसानीची ऑफलाईनव्दारे प्रपत्र-2 मध्ये माहिती भरुन सूचना दयावी.
फळपिकाचे नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गावपातळीवर विमा कंपनीमार्फत सुरु असुन शेतकऱ्यांनी मोबाईल चालू ठेवावा. तसेच शेतकऱ्यांनीपंचनामे पूर्ण करण्यासाठी विमा कंपनीला सहकार्य करावे. त्याचबरोबर विमा कंपनीला पुर्व सुचना केल्याच्या 5 दिवसात विमा कंपनीमार्फत होणारे पंचनामे पुर्ण करावेत सदर नुकसानीचे पंचनामे योजनेच्या कार्यपध्दतीनुसार करण्यात येत असल्याने त्यासाठभ् शेतकऱ्यांकडुन कोणतेही शुल्क आकरले जात नाही. त्यामुळे कोणी पैसे मागत असल्यास देवू नये. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानी पासुन बचाव करणेसाठी शेतकरी बांधवांनी बांधावर वारारोधक म्हणून अनुदानीत बांबु पिकाची लागवड करावी असे आवाहन पालकमंत्री महोदय यांनी केली
या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी डॉ. पंकज आशिया, मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा तक्रार निवारण सदस्य हितेश आगीवाल, विमा कंपनी प्रतिनिधी अतुल झंकार, नितीन कुमार, कुंदन बारी, शेतकरी दगडु चौधरी डॉ. सत्वशिल जाधव व किरण पाटील यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.