<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- सहाय्यक आयुक्त (अन्न) व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई घेण्याची मोहिम सुरु केली असून खालील प्रमाणे – वाहन क्रमांक HR-38-AB-3537 सहा चाकी वाहन, टाटा मोटर्स लि. वाहन क्रमांक HR-38-AB-4331 सहा चाकी वाहन, अशोक लेलॅड, वाहन क्रमांक NL-01-AC-8098 सहा चाकी वाहन, आयशर प्रो. 5016 (कारवाई ठिकाण – भुसावळ तालुका पो. स्टे. आवार भुसावळ, जि. जळगाव
2) प्रशांत शिरुडे यांचे गोडावून नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव, लाली पान शॉप आकाशवाणी चौक जळगाव या ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करुन सदर आस्थापनांस सिल लावण्यात आले आहे व सदर पेढी मालकास अटक करण्यात आले आहे व प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्या आस्थापनेस अन्न परवाना किंवा नोंदणी दिलेली असेल तर तिही निलबीत करण्यात येईल.
प्रतिबंधित अन्न पदार्थावर कारवाईची तिव्रता वाढविणार असून प्रसंगी नाशिक विभागाअंतर्गत इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यात बोलावून मोहीम राबविण्यात येणार आहे. असे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.