<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम- 2022/प्र.क्र.192/पं.रा.3 नुसार आज 21 व्या शतकात वावरत असतांना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळयातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते.
सदर महिलांनी इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याची पुर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निमुलन होणे आवश्यक आहे. या करीता कोणत्याही महिलेवर याबाबतीत अन्याय होत असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 0257-2228828 व वन स्टॉप सेंटरचे दुरध्वनी क्र. 0257-2998311 वर संपर्क साधावा.
असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेआहे.