Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देतो. कोविड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधिताना मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त विजय क्षीरसागर, अंगणवाडी कर्मचारी समितीचे  एम. ए. पाटील, राजेश सिंह, निशा शिवूरकर, विजया सांगळे, अनिता कुलकर्णी, अरूणा अलोणे, माया पवार, चंदा लिगरवार, हुकुमताई ठमके उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल, मुलींचे नेत्रदीपक यश

Next Post

गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा दहावीच्या परिक्षेत दैदिप्यमान यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo