<
जळगांव(चेतन निंबोळकर)- मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आत्मीयता असते आजच्या धकाधकीच्या जीवनात इतरांविषयी सहानभूती निर्माण होणारे क्षण विरळच असतात.असे सर्वश्रृत घडत असले तरी आज ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय जळगांव येथील समाजसेविका सौ. निशा पवार व त्यांच्या समाजसेवक सहकार्यांनी शेलवड ता.बोदवड येथील निराधार बालगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तू देऊन दाखवून दिला. येथिल समाज कल्याण अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या श्री गजानन महाराज बालगृहातील ३०मुलांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच शैक्षणिक साहित्य दिले.
देण्यात आलेल्या साहित्यामध्ये शालेय साहित्य बॉल पेन,स्केच पेन पाकीट, क्रिडा साहित्य, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू जसे की, अंगाला लावायचे साबण, डोक्याला लावण्याचे तेलाच्या बाटल्या, कोलगेट, ब्रश, पावडर चे डबे,कपडे धुण्यासाठी साबण, कंगवे, बिस्कीट पाकीट, चॉकलेट तसेच कॅरम बोर्ड,बॅटमिंटन या सर्व वस्तू यावेळी देण्यात आल्या. यावेळी, उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे तेथील विद्यार्थाच्या चेहर्यावर हास्य निर्माण झाले. यावेळी समाजसेविका सौ. निशा पवार, मौलाना आझाद फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख ,मिना परदेशी, सुनीता अग्रवाल, हर्षल सर, साळूंखे सर,चेतन निंबोळकर,चैतन्य पवार, देवश्री पवार,आदी उपस्थित होते.