<
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यात सन 2021-22 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इंन्सुरन्स कंपनी मार्फत अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात आलेली होती. सदर योजनेत शेतकरी हिस्सा म्हणून रुपये 27.48 कोटी विमा कंपनीकडे भरण्यात आले होते. या पुर्वी खरीप पिकांसाठी मिड सिजनसाठी रुपये 27.72 कोटी, स्थानिक आपत्तीसाठी रुपये 37.98 कोटी व काढणी पच्छात रुपये 0.26 कोटी असे एकूण रुपये 65.96 कोटी रक्कम 95,823 शेतकऱ्यांच्या बॅक खाती आय.सी.आय.सी लोमबार्ड विमा कंपनीकडून जमा करण्यात आली आहे.
सदर योजनेचे खरीप पिकांची उत्पन्नावर आधारीत अंतिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली असुन रुपये 118.97 कोटी रक्कमेचे वाटप विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बॅक खाती जमा करण्याचे काम चालू आहे. याप्रमाणे जिल्हयाची सन 2021-22 या वर्षाची खरीप पिकांची एकुण नुकसान भरपाई 1,04,270 शेतकऱ्यांना रुपये 184,93 कोटी रक्कम विमा कंपनी कडुन मंजूर झालेली आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.