<
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- बदलते निसर्गचक्र ओळखून निसर्गाच्या जवळ जात शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सानेगुरुजी सभागृहात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे आदी. अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे या वेळी पूजन करण्यात आले.
या वेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की , दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान होते .शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहेत या योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करणे गरजेचे आहे. शेती सोबतच कृषी उद्योजकता वाढीस लागणे गरजेचे आहे. त्या सोबतच प्रक्रिया उद्योगावर शेतकऱयांनी भर दिला पाहोजे. पारंपारिक तंत्रद्यानात बदल करून यांत्रिकीकरणाचा साहाय्याने शेतीला अधिक विकसित करणे महत्वाचे आहे. असेही ते म्हणाले.
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळणे महत्वाचे आहे. शासनाच्या योजनांचा शेतकऱयांनी अधिकाधिक फायदा घेऊन आपली शेती विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , शेतकऱयांनी आपल्या पिकपद्धतीत बदल करून बहुविध पीकपद्धती घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीकडे वळून शेती विकसित करणे महत्वाचे आहे .हे सांगतानाच त्यांनी शेतकऱयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱयांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात देवेंद्र माळी, बळीराम वराडे, राहुल पाटील, संभाजी पाटील, यांचा समावेश होता. शेतकऱयांनी शेतात फवारणी करताना काळजी घ्यावी, यासाठी फवारणी किट चे वितारण देखील शेतकऱयांना करण्यात आले. सोबतच नॅनो युरिया पॅक चे वितरण देखील करण्यात आले. कापूस संगोपन व लागवड या विषयावर शास्त्रज्ञ संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले.