<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल वर्धमान ॲकेडमी सी. भी. एस. सी. स्कुलमध्ये ओझोन डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सायकल रॅली काढुन करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन शाळेचे संस्थापक श्री.नरेंद्र मोदीजी व शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरासर तसेच सौ. ललिता अग्रवाल व डॉ. विनिता खडसे या मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत सर्व मुलांच्या हातात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘जल है तो जीवन है’ असे आदि विविध प्रकारचे बॅनर घेऊन संपुर्ण परिसरात जाऊन जनजागृती करण्यात आली. तसेच ही रॅली वर्धमान स्कुल परिसरातुन आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, ओंकारेश्वर मंदीर रिंग रोड व तसेच स्टेडीयम परीसर कडुन नवीन बस स्टँडपर्यंत काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरासर यांनी ‘ओझोन डे’ चे महत्त्व आपल्या भाषणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाद्वारे सांगितले. या रॅलीत इ.1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील रॅलीत सहभागी होऊन ‘ओझोन डे’ विषयी जनजागृती केली. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.