<
आरोग्य
कोणत्याही व्यक्तीला किडनी स्टोन अर्थात मुतखड्याचा आजार झाल्यास, त्याला प्रचंड त्रास व वेदना सहन कराव्या लागतात. बहुतांश लोक मूत्रपिंडातील खडे काढण्याकरिता शस्त्रक्रियाही करवतात. परंतु आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत, जे तुमचा स्टोनचा त्रास कमी करतील.
◆ भरपूर पाणी प्या – दिवसातून किमान १० ते १२ ग्लास पाणी प्यायल्याने पाण्यामुळे स्टोन तयार करणारी क्षार व रसायने विरघळण्यास मदत होते आणि मूत्र तयार होण्याचे प्रमाण जितके जास्त असेल तितके कमी स्टोन तयार होतील, म्हणून आपण मूत्रपिंडात स्टोन असल्यास शक्य तितके पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
◆ केळी – केळीमध्ये बी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरात स्टोन तयार होण्यास प्रतिबंध आणि तयार झालेल्या स्टोनला लहान भागांमध्ये तोडण्यास मदत करते. दररोज १०० ते १५० ग्रॅम व्हिटॅमिन बीचे सेवन केल्यास कधीच मुतखडा होणार नाही.
◆ सफरचंद – एन एपल अ डे, किप्स डॉक्टर अवे, हे वाक्य सफरचंदाच्या बाबतीत १००% खरे आहे. अनेक रोगांवर गुणकारी असणारे सफरचंद हे तुमचा किडनी स्टोनचा त्रासही कमी करण्यास फायदेशीर आहे. याकरिता आपण दररोज १ सफरचंद खावे अथवा त्याचा रस प्यावा.
◆ कोथिंबीर – जेवणास लज्जतदार बनविणारी कोथिंबीरीतही शरीराला डिटॉक्स करण्याचे म्हणजेच टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून शरीर शुद्ध करण्याचे गुण आहेत, म्हणून शरीराला विषमुक्त करण्यासाठी आपण धणे अथवा हिरवी कोथिंबीर आवर्जून खावी.
◆ मुळा व गाजर – मुळा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने मुतखड्याची व्याधी दूर तर होतेच, त्याचबरोबर पित्ताशयात असणारे खडेही निघून जातात तसेच आपण गाजराचेही सेवन केल्यास, यातील अँटीऑक्सिडन्ट्स हे स्टोन विरघळण्यात मदत करतात.
◆ नारळ पाणी – नैसर्गिक टॉनिक अर्थात नारळ पाणी हे शरीरातील इन्सुलिन व पाण्याची मात्रा वाढवण्यास उपयुक्त ठरते. यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते व शरीरातील जास्तीत जास्त टाकाऊ पदार्थ बाहेर फेकले जातात.
टीप – वरील लेख हा केवळ माहितीसाठी असून, यातील कोणत्याही पदार्थांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.