<
तंत्रज्ञान
सायबर क्राईम करणारे गुन्हेगार हे दरवेळेस त्यांचे सावज हेरण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात, ज्याला अनेक सर्वसामान्य लोक बळी पडतात. यामुळे लोकांचे आर्थिक, सामाजिक नुकसान तर होतेच, शिवाय मानसिक मनस्तापही सहन करावा लागतो. जर तुम्हालाही तुमच्या मोबाईल फोनवर “अशा” प्रकारचा संदेश येत असेल तर वेळीच सावध व्हा.
◆ काय आहे हे प्रकरण?
बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त व नोकरीची शोधाशोध करणाऱ्यांना हॅकर्स ८,००० रुपये प्रति दिवस कमावण्याचे संदेश पाठवितात आणि ही नोकरी पक्की करण्यासाठी या संदेशात असणाऱ्या व्हाट्सएप चॅटच्या लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. यानंतर हे गुन्हेगार आपल्या स्मार्टफोनचा संपूर्ण डेटा व गोपनीय माहिती मिळवून बँक खाते रिकामे करतात. असाच संदेश एका आयफोन वापरकर्त्यासही मिळालेला आहे.
◆ अशावेळी काय उपाय कराल?
एसएमएस पाठवणार्याची नेमकी माहिती जाणून घेणे अवघड असल्यास अशा नोकरीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करा व कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. यामुळे आपला वैयक्तिक डेटा व बँक खात्याची माहिती लीक होऊ शकते.
एसएमएस कुणाच्या मोबाईल नंबरवरून आला आहे का, ते तपासा. जर मोबाईल नंबर ऐवजी टेलीमार्केटिंग कोडवरून एसएमएस आला असेल, तर समजून घ्या की येथे धोका आहे. हे चेक करण्यासाठी आपण Truecaller एप चा वापर करू शकता.
एसएमएस किंवा मेसेजच्या भाषेत व्याकरणाच्या किंवा स्पेलिंगच्या अनेक चुका आहेत, तरीही हे काम सायबर गुन्हेगार करू शकतात. त्यामुळे नेहमी सावध राहा.
काळजीपूर्वक पाहिले तर मोबाईलवर येणारे जवळपास बहुतांश एसएमएस किंवा मेसेजेस फसवणुकीचे असतात. हे कुठल्यातरी बनावट एजन्सीचे किंवा हुशार व्यक्तीचे काम असते, त्यामुळे अशा ऑफर्सपासून नेहमी स्वतःचे संरक्षण करा. आपण आपल्या मोबाईलवर येणारे असे फसवे कॉलही ब्लॉक करून स्वतःला वाचवू शकता.
नोकरीसाठी कोणालाही पैसे देणे / आर्थिक व्यवहार करणे टाळावे. काही ठिकाणी नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैशांची मागणीही केली जाते. निष्पाप लोक चांगल्या नोकरीच्या शोधात सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात. म्हणून नोकरी लावण्यासाठी कुणी पैसे मागितले तर कुणी पैसे देऊ नयेत.
या प्रकरणात आयफोन वापरकर्त्याने शहाणपणाने प्रसंगावधान राखत या एसएमएसकडे दुर्लक्ष केले आणि कोणत्याही संभाव्य हानीपासून स्वतःला वाचवले.